QR code : क्यूआर कोड म्हणजे कायरे भाऊ?, जाणून घ्या ‘क्यूआर’च्या माध्यमातून फसवणूक कशी होते

वर्तमानपत्रात क्यू आर कोडचा गैरवापर करून फसवल्याच्या अनेक बातम्या येतात. मात्र, खरंच क्यूआर कोडमध्ये एवढी जोखिम आहे का?, फसवणुकीपासून कसा बचाव केला जाऊ शकतो, जाणून घेऊयात.

QR code : क्यूआर कोड म्हणजे कायरे भाऊ?, जाणून घ्या 'क्यूआर'च्या माध्यमातून फसवणूक कशी होते
अजय देशपांडे

|

Jul 03, 2022 | 11:40 AM

मुंबई : पुण्यात (PUNE) राहणाऱ्या स्वरानं ऑनलाईनं किराणा सामान मागवलं. डिलीवरी बॉयनं सामान दिल्यानंतर, पैसे (Money) देण्यासाठी एक क्युआर कोड स्कॅन करण्यासाठी सांगितलं. स्कॅन केल्यानंतर एक लिंक जनरेट झाली. लिंकवर क्लिक केलानंतर निर्देशाचं पालन करत पेमेंट (Payment) पूर्ण केलं. मात्र, थोड्यावेळानंतर तिच्या खात्यातून पैसे डेबिट होत असल्याचे मेसेज आले. काही वेळातच तिच्या खात्यातील रक्कम शून्य झाली. ही घटना फक्त स्वरापुरताच मर्यादित नाही. वर्तमानपत्रात क्यू आर कोडचा गैरवापर करून फसवल्याच्या अनेक बातम्या येतात. मात्र, खरंच क्यूआर कोडमध्ये एवढी जोखिम आहे का ? QR कोडचा वापर करू नये का? अशा प्रकारची फसवणूक कशी टाळता येईल? असे अनेक प्रश्न निर्माण होतायेत. चला तर मग यासंदर्भात माहिती घेऊयात. सुरुवातीला क्यूआर कोड म्हणजे नक्की काय आहे हे पाहूयात.

क्यूआर कोड म्हणजे काय?

ब्लॅक कलरच्या चौकटीत एक वेगळ्याच प्रकारचा पॅटर्न असतो. क्यू आर कोड म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड. क्यूआर कोडला स्कॅन केल्यानंतर एक लिंक तयार होते. बार कोड प्रमाणेच प्रत्येक क्यूआर कोड थोडासा वेगळा असतो. बहुतांश वेळा तुम्ही दुकानांवर देवाण-घेवाणीसाठी पेटीएम किंवा इतर क्यूआर कोड पाहिले असतीलच. या क्यूआर कोडचा वापर करून सध्या मोठ्या प्रमाणात व्यवहार होत आहेत. क्यूआर कोडचा वापर करून व्यवहारात वाढ होत असतानाच फसवणुकीचेही प्रकार मोठया प्रमाणात वाढत आहेत.

कशा प्रकारे फसवणूक होते?

मुळात प्रत्येक क्यूआर कोडच्या मागे एक URL लपलेला असतो. त्याद्वारे तुम्हाला एका साईटवर रिडायरेक्ट केलं जातं. साईटवर एखाद्या ठिकाणी क्लिक करायला सांगितलं जातं. असं केल्यामुळे तुमच्या बँक खात्यांची माहिती संबंधित व्यक्तीकडे पोहोचते. पैसे देण्यासाठी क्यूआर कोडचा वापर करण्यात येतो. तुमच्याकडे असलेल्या क्यूआर कोडला स्कॅन करून पैसे देण्यात येतात. फसवणुकीच्या प्रकरणात तुम्हाला हा क्यूआर कोड स्कॅन केल्यास तुम्हाला पैसे मिळतील ,असं सांगितलं जातं. तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करताच तुमच्या खात्यातून पैसे कमी होतात.

हे सुद्धा वाचा

फसवणुकीपासून कसा बचाव करावा ?

फोनच्या स्कॅनरचा वापर करून कोणताही क्यूआर कोड स्कॅन करू नका. पैसे देण्यासाठी क्यूआर कोडचा वापर करावा लागत असल्यास पेटीएम, व्हाट्सअ‍ॅप, फोन पे किंवा भीम सारख्या अ‍ॅपचा वापर करा. तुम्हाला पैसे घेणाऱ्या व्यक्तीचं नाव दिसतं, तुम्हाला नावात संशय वाटल्यास पेमेंट करू नका. तुमच्या बँक खात्यातून पैसे कपात झाले असल्यास तात्काळ बँकेशी संपर्क करा. पोलिसात तक्रार दाखल करा. अशा फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी एकाहून अधिक पेमेंट अ‍ॅप्सचा वापर करू नका. पासवर्ड स्ट्ऱॉंग ठेवा आणि वेळच्यावेळी पासवर्ड बदला. फोनला कोड लॉक किंवा फेस लॉक करा.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें