AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील टॉप टेन बॅंका कोणत्या पाहा, भारताच्या बॅंकेचा पाहा कितवा आहे नंबर

जगातील टॉप 10 बॅंकांकडे अब्जावधीची संपत्ती आहे. भारताच्या केवळ एका खाजगी बॅंकेचे यात नाव सामील आहे. चला पाहूया जगातील टॉप 10 बॅंकांची एकूण नेटवर्थ किती आहे.

जगातील टॉप टेन बॅंका कोणत्या पाहा, भारताच्या बॅंकेचा पाहा कितवा आहे नंबर
Top BanksImage Credit source: socialmedia
| Updated on: Sep 09, 2023 | 5:07 PM
Share

नवी दिल्ली | 9 सप्टेंबर 2023 : जगात बॅंकांमुळे त्या राष्ट्रांचा दबदबा पहायला मिळत असतो. बॅंका नागरिकांच्या पैशांना सुरक्षित ठेवण्याबरोबर आर्थिक सहकार्य देण्यासाठी पुढाकार घेत असतात. जर जगातील सर्वात मोठ्या बॅंकांचा जेव्हा विषय निघतो तेव्हा पुढारलेल्या देशांची नावे समोर येतात. म्हणजेच बॅंकांचे महत्व आपल्याला कळले असेल. अखेर कोणत्या देशात जगातील सर्वात मोठी बॅंक कार्यरत आहे ? या प्रश्नांचे उत्तर सोपं आहे जगातील सुपर पॉवर असलेल्या अमेरिकेतच सर्वात मोठी बॅंक अस्तित्वात आहे. टॉप टेन बॅंकाच्या यादीत अमेरिका आणि चीनच्या अनेक बॅंकांचा समावेश आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका

जेपी मॉर्गन चेज ही जगातील सर्वात मोठी बॅंक आहे. जिचे मुख्यालय अमेरिकेतील न्युयॉर्क येथे आहे. फोर्ब्जच्या मते या बॅंकेचे एकूण मार्केट कॅप म्हणजेच बाजारमुल्य 432 अब्ज डॉलर आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर बॅंक ऑफ अमेरिकेचे नाव आहे. बॅंक ऑफ अमेरिकेचे एकूण बाजार मूल्य 231.52 अब्ज डॉलर आहे.

तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर चीन

या यादीत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर चीनच्या दोन बॅंका आहेत. इंडस्ट्रीयल एण्ड कमर्शियल बॅंक ऑफ चायना लिमिटेड आणि एग्रीकल्चर बॅंक ऑफ चायना यांचा समावेश आहे. इंडस्ट्रीयल एण्ड कर्शियल बॅंक ऑफ चायना लिमिटेडचे मार्केट कॅप म्हणजेच बाजारमुल्य 194.56 अब्ज डॉलर आहे. तर एग्रीकल्चर बॅंक ऑफ चायना हीचे बाजारमुल्य 160.68 अब्ज डॉलर आहे.

पाचव्या नंबर भारताच्या या बॅंकेची बाजी

जगातील टॉप 10 बॅंकात पाचव्या क्रमांकावर भारताची बॅंक विराजमान आहे. एचडीएफसी बॅंक ही खाजगी बॅंक पाचव्या क्रमांकावर आहे. हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन ( HDFC ) आणि HDFC Bank चे मर्जर झाल्यानंतर HDFC बॅंक जगातील सर्वात ताकदवान बॅंकात सामील झाली आहे. एचडीएफसी बॅंकचे विलीनीकरण 1 जुलैपासून झाले आहे.एचडीएफसी बॅंकेचे एकूण बाजारमुल्य 157.91 अब्ज डॉलर झाले आहे.

या बॅंकाचाही समावेश आहे

या यादीत Well Fargo बॅंकचे नाव 6 व्या स्थानावर आहे. या बॅंकेची बाजारमुल्य 155.87 अब्ज डॉलर आहे. लंडनची HSBC बॅंक सातव्या क्रमांकावर असून तिचे बाजार मूल्य 148.90 अब्ज डॉलर आहे. न्युयॉर्कच्या मॉर्गन स्टेनली बॅंक आठव्या क्रमांकावर असून तिचे बाजार मुल्य 140.83 अब्ज डॉलर आहे. नवव्या क्रमांकावर चायना कंस्ट्रक्शन बॅंक असून तिचे बाजार मुल्य 139.82 अब्ज डॉलर आहे. दहाव्या क्रमांकावर बॅंक ऑफ चायना असून तिचे बाजार मुल्य 136.81 अब्ज डॉलर आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.