क्रेडिट स्कोअर नियमित तपासणे का गरजेचं ? जाणून घ्या फायदे
क्रेडिट स्कोअर नियमित तपासणं आर्थिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. यामुळे तुमच्या कर्जाच्या पात्रतेची माहिती मिळते, चुका लवकर लक्षात येतात आणि आर्थिक निर्णय अधिक शहाणपणाने घेता येतात. त्यामुळे तुमच्या आर्थिक भविष्यासाठी क्रेडिट स्कोअर तपासणं आवश्यक आहे, जाणून घ्या त्याचे फायदे!

क्रेडिट स्कोअर नियमित तपासणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल किंवा वैयक्तिक कर्ज घेतले असेल, तर तज्ज्ञ सल्ला देतात की, तुम्ही वेळोवेळी क्रेडिट स्कोअर तपासावा. किमान वर्षातून एकदा तरी क्रेडिट स्कोअर पाहणे गरजेचे आहे. क्रेडिट स्कोअर म्हणजे 300 ते 900 च्या दरम्यान असलेली तीन अंकांची संख्या. ही संख्या तुमची क्रेडिट पात्रता दर्शवते.
क्रेडिट स्कोअर हा तुमच्या आर्थिक विश्वासार्हतेचा आरसा आहे. तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल किंवा कर्ज घेतले असेल, तर क्रेडिट स्कोअर नियमित तपासणे गरजेचे आहे. हा स्कोअर 300 ते 900 च्या दरम्यान असतो. जितका जास्त स्कोअर, तितका बँकांचा तुमच्यावर विश्वास वाढतो. जर स्कोअर खराब असेल, तर बँका कर्ज देण्यास नकार देऊ शकतात. म्हणूनच वर्षातून किमान एकदा क्रेडिट स्कोअर तपासा. चला, क्रेडिट स्कोअर तपासण्याचे फायदे पाहूया.
क्रेडिट स्कोअर तपासण्याचे प्रमुख फायदे :
1. क्रेडिट स्कोअरवर काय परिणाम करत आहे, हे समजते. उदा., जास्त क्रेडिट वापर किंवा उशिरा पेमेंट. याची माहिती मिळाल्यावर सुधारणा करणे सोपे होते.
2. क्रेडिट स्कोअर तपासल्याने तुमची आर्थिक स्थिती समजते. तुमचा क्रेडिट वापर, कर्ज पात्रता आणि आर्थिक आरोग्य याची माहिती मिळते.
3. नियमित तपासणीमुळे क्रेडिट अहवालातील चुका लवकर समजतात. त्या दुरुस्त करून स्कोअरवर होणारा नकारात्मक परिणाम टाळता येतो.
4. चांगला क्रेडिट स्कोअर तुम्हाला कमी व्याजदर आणि जास्त कर्ज मिळवून देतो. बँका तुम्हाला विश्वासार्ह समजतात आणि चांगल्या अटी देतात.
5. कारसारखी महाग वस्तू खरेदी करायची असेल, तर आधी स्कोअर तपासा. स्कोअर कमी असेल, तर तो सुधारण्यासाठी वेळ मिळतो. चांगल्या स्कोअरने कर्ज मिळणे सोपे होते.
6. चांगला स्कोअर तुम्हाला प्रीमियम क्रेडिट कार्डसाठी पात्र ठरवतो. यात जास्त रिवॉर्ड, सवलती आणि इतर फायदे मिळतात.
क्रेडिट स्कोर चांगला ठेवण्यासाठी काही सोपे पण महत्त्वाचे टिप्स:
1. कर्जाचे EMI, क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरा, उशीर झाल्यास नकारात्मक परिणाम होतो.
2. तुमच्या क्रेडिट लिमिटच्या ३०-४०% पेक्षा जास्त वापरू नका. कमी वापरलेला क्रेडिट स्कोर सुधारतो.
3. वारंवार कर्जासाठी अर्ज केल्याने क्रेडिट स्कोर कमी होतो.
4. कर्जाचे वेगवेगळे प्रकार (होम लोन, पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड) असल्यास स्कोर चांगला राहतो.