जुनी पेंशन योजना लागू होणार का ?
जुनी पेंशन योजना लागू करा अशी सरकारी कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांची मागणी आहे. जुनी पेंशन योजना लागू होणार का ? सरकार कर्मचाऱयांच्या काय आहेत मागण्या पाहा .

मी रमेश मोरे. मी रत्नागिरी येथे लेखापालाचे काम करतो. खूप हिंमत एकत्र करून तुम्हाला पत्र लिहिण्याचे धाडस करत आहे. हे पत्र गोपनीय राहील अशी अपेक्षा आहे. निर्मला मॅडम. आम्हाला वर्षातून 2 वेळा बोनस मिळतो. बोनस जास्त नाही मिळत नाही कमी मिळालं तरी आनंद वाटतं. परंतु आता बोनसमधील 65 % रक्कम गुंतवणूक म्हणून ठेवली जावी असा नियम आणला आहे त्यामुळे 35 % बोनसच हातात पडतो . एवढंच नाही तर आमचा पगारात मोठ्या मुश्किलीनं तीन ते चार टक्के वाढ होते पगारवाढीपेक्षा महागाईचा वेग अधिक आहे हे तुम्हाला माहीतच आहे . या महागाईमुळे कुटुंबाचा खर्च उचलणे देखील कठीण होत आहे. अधिकारी वर्गासाठी अनेक गोष्टी सोप्या होतात परंतु तृतीय आणि द्वितीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांनी काय करावे ? काही काही विभागांमध्ये वर्षातून दोनदा पगारवाढ होते. पण महसूल विभागाचे इतके नशीब कुठे ?
तुम्हाला माहीत आहे प्रत्येक सरकारी कामात आम्हाला सहभागी व्हावे लागते. निवडणुकांच्या वेळी ड्यूटी लावली जाते. निवडणुकीच्या वेळी आम्हाला निवडणूक अधिकाऱ्यांचा दर्जाही….
पत्रात पुढे काय आहे हे जाणून घ्या ….
