AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Elon Musk : X फॅक्टरची जादू, एलॉन मस्क पुन्हा बाजीगर!

Elon Musk : सातत्यपूर्ण बदल हा सृष्टीचा नियम जगातील अब्जाधीश एलॉन मस्क याच्या पथ्यावर पडला आहे. नवनव प्रयोग करण्यात त्याचा हातखंड आहे. त्यात कधी तो फेल होतो, तर कधी बाजीगर ठरतो.

Elon Musk : X फॅक्टरची जादू, एलॉन मस्क पुन्हा बाजीगर!
| Updated on: Jul 25, 2023 | 8:50 AM
Share

नवी दिल्ली | 25 जुलै 2023 : टेस्ला आणि ट्विटरचा मालक एलॉन मस्क (Elon Musk) हा अतरंगी आहे. सातत्याने काही तरी बदल करणे हा त्याचा नियम. हा सृष्टीचा नियम त्याच्या पथ्यावर पडला आहे. त्याचे काही निर्णय चांगलेच अंगलट आले. त्यात ट्विटरचे अधिग्रहण आणि टेस्लाच्या इलेक्ट्रीक कारची स्वस्ता विक्रीचा निर्णय त्याला गोत्यात आणणारा ठरला. त्याच्या संपत्तीत मोठी घसरण झाली होती. पण त्याने मनासारखे बदल करण्याचे सत्र काही थांबवले नाही. यंदाचे वर्ष त्याच्यासाठी लक्कीच म्हणावे लागेल. फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलेनिअर इंडेक्सनुसार (Forbes Real Time Billionaire Index) एलॉनने जागतिक श्रीमंतांच्या यादीत पुन्हा भरारी घेतली आहे. त्याने अव्वल स्थान पटकावले. जगातील सर्वात श्रीमंत फ्रान्सचे बर्नार्ड ऑरनॉल्ट दुसऱ्या स्थानावर फेकले गेले.

ट्विटरची नवीन ओळख

एलॉन मस्क यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. ट्विटरचा चेहरामोहरा बदलण्याचा त्याचा निर्णय फायद्याचा ठरला. या नवीन ओळखीने त्याचा फायदा झाला. मस्क याने ट्विटरचा लोगो बदलवून तो ‘X’ असाच केला नाही तर नवीन डोमेन X.com पण सुरु केले.

सोशल नेटवर्किंगचे फायद्याचे गणित

ट्विटर म्हणजे आताचे ‘X’ केवळ सोशल नेटवर्किंग, मॅसेजिंग प्लॅटफॉर्म नसेल. तर त्यावर युझर्सला बॅकिंग, पेमेंट आणि ई-कॉमर्स अशा सेवा मिळतील. हे सर्व बदल सोमवारपासून लागू झाले आहेत. त्यामुळे युझर्सला एकाच प्लॅटफॉर्मवरुन विविध सेवांचा पण लाभ घेता येईल.

एलॉन मस्क याची नेटवर्थ

फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलेनिअर इंडेक्सनुसार एलन मस्क याच्या संपत्तीत 4.5 अब्ज डॉलरची भर पडली. या सर्व घडामोडींमुळे त्याची संपत्ती 241 अब्ज डॉलर इतकी झाली. तर बर्नार्ड ऑरनॉल्ट यांच्या संपत्तीत 2.8 अब्ज डॉलरची घसरण झाली. ते 234.6 अब्ज डॉलरचे मालक आहेत. या अपडेटमुळे ते पहिल्या क्रमांकावरुन दुसऱ्या स्थानी घसरले.

शेअरमध्ये उसळी

एलॉन मस्क यांच्या संपत्तीत जोरदार उसळी आली. त्याचा परिणाम मस्क याच्या टेस्ला कंपनीवर दिसला. टेस्लाचा शेअर सोमवारी तेजीत होता. टेस्लाचा शेअर यावेळी 3.39 टक्क्यांनी वाढला. हा शेअर 268.92 डॉलरवर पोहचला होता.

टॉप-5 श्रीमंत

या यादीत ॲमेझॉनचे जेफे बेजोस 151.6 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत. लॅरी एलिसन हे 148 अब्ज डॉलर संपत्तीसह चौथ्या स्थानावर आहेत. तर मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स 120.7 अब्ज डॉलरसह संपत्तीसह पाचव्या क्रमांकावर होते.

मुकेश अंबानी यादीत कुठे?

या यादीत भारताचे आणि आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी 15 व्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 89.2 अब्ज डॉलर आहे. रिलायन्स हा भारतातील मोठा उद्योग समूह आहे. ही हा समूह कच्चा तेलाची रिफायनिंग करतो. टेलिकॉम, रिटेल सेक्टरमध्ये पण या समूहाचा दबदबा आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.