सरकारची भन्नाट योजना, झटक्यात व्हाल श्रीमंत, घरी घेऊन जा तब्बल 40 लाख रुपये; जाणून घ्या!
अनेकांना कोणतीही जोखीम न पत्करता पैशांची गुंतवणूक करायची असते. त्यांच्यासाठी सरकारची एक खास योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला तब्बल 40 लाख रुपये मिळू शकतात.

What Is PPF Scheme : प्रत्येकालाच श्रीमंत व्हावसं वाटतं. आपल्याजवळ असलेल्या पैशांचे मूल्य वाढावेत म्हणून अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात. काही जण शेअर बाजार, म्युच्यूअल फंड, सोने, गोल्ड बॉण्ड अशा वेगवेगळ्या माध्यमातून पैशांची गुंतवणूक करतात. तर काही लोक कोणतीही जोखमी न घेता सरकारी योजनांत पैसे गुंतवून जास्त पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात. भारत सरकारच्या अशा अनेक योजना आहेत, ज्या तुम्हाला एका निश्चित परताव्याची हमी देतात. एका योजनेत तर सरकार तुम्हाला फक्त 15 वर्षात तब्बल 40 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम देते. विशेष म्हणजे ही सर्व रक्कम टॅक्स फ्री असते. त्यामुळे अनेकजण या योजनेत डोळे झाकून गुंतवणूक करतात आणि निश्चित वर्षानंतर सरकारच्या ठरलेल्या नियमानुसार पैसे घेऊन जातात.
अनेकांसाठी योजना ठरू शकते जॅकपॉट
सरकारच्या या योजनेचे नाव पब्लिक प्रोव्हिडेंट फंड अर्थात पीपीएफ असे आहे. या योजनेत कोणतीही जोखीम नाही. ही योजना अनेकांसाठी जॅकपॉट ठरू शकते. या योजनेत पैसे गुंतवल्यास चांगला परतावा मिळतो. तुम्ही एक योजना आखून पंधरा वर्षांसाठी पैसे गुंतवले तर तब्बल एकूण 40 लाख रुपयांचे तुम्हाला मिळू शकतात.
पीपीएफ योजना काय आहे, किती फायदा होतो?
पीपीएफ योजना ही एक सरकारी योजना आहे. त्यामुळे घाबरण्यासारखे काहीही नाही. ज्या लोकांकडे जोखीम घ्यायची क्षमता कमी आहे, अशा लोकांसाठीच ही योजना तयार करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत गुंतवलेल्या पैशांवर 7.1 टक्क्यांनी व्याज दिले जाते. हे व्याज वार्षिक असते. तुम्ही गुंतवलेले पैसे या योजनेत पूर्णपणे सुरक्षित असतात.
तुम्हाला 40 लाख रुपये कसे मिळू शकतील?
पीपीएफ योजनेत गुंतवलेल्या पैशांची मॅच्यूरिटी ही 15 वर्षे असते. तुम्ही प्रत्येक वर्षाला कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत सात् दीड लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही प्रत्येक वर्षाला दीड लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर 15 वर्षांनी तुम्हाला 40 लाखांपेक्षा जास्त पैसे मिळतील. मिळालेली ही सर्व रक्कम करमुक्त असेल. भांडवली बाजारातील चढउतारावर या योजनेतील पैशांचे मूल्य कमी किंवा अधिक होत नाही. त्यामुळे ही योजना सुरक्षित मानली जाते.
