बँकेत तुमचीही एकापेक्षा जास्त खाती आहेत? ‘हे’ नुकसान होऊ शकतं

बँकेत तुमचीही एकापेक्षा जास्त खाती आहेत? ‘हे’ नुकसान होऊ शकतं

मुंबई : वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असताना त्या-त्या कंपनीच्या नियमांनुसार नवे सॅलरी अकाऊंट उघडावे लागतात. प्रत्येकवेळी नवे खाते उघडल्यानंतर जुने खाते निष्क्रिय होऊन जातं. कारण त्यानंतर आपण त्याचा वापर करत नाही. पण ते निष्क्रिय झालेले खाते हे बंद करण्याएवजी तसेच पडून राहते. या निष्क्रिय झालेल्या खात्याचा आपल्याला कुठला फायदा होत नसला, तरी त्याचे अनेक नुकसान आपल्याला भोगावे लागू शकतात.

दंड भरावा लागू शकतो-

कुठल्याही पगारी खात्यात तीन महिन्यांपर्यंत पगार आला नाही, तर त्या खात्याचे रुपांतर बचत खात्यात होते. त्यानंतर त्या खात्याचे बँकेसंबंधीचे नियमही बदलतात. बँकेच्या नियमांनुसार बचत खात्यात एक किमान रक्कम ठेवावी लागते. जर तुम्ही ही रक्कम राखून ठेवली नाही तर बँक तुमच्याकडून दंड आकारु शकते. इतकंच नाही तर तुमच्या खात्यातील जमा रक्कमेतून पैसेही कापू शकते.

क्रेडिट स्कोअर खराब होतो-

एकाहून जास्त निष्क्रिय खाते असल्याने तुमचा क्रेडिट स्कोअरही खराब होऊ शकतो. तुमच्या खात्यात किमान रक्कम नसल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होतो. त्यामुळे नोकरी बदलल्यावर निष्क्रिय खाते बंद करा.

आर्थिक तोटा होऊ शकतो –

निष्क्रिय खात्याचा वापर न केल्याने आर्थिक तोटाही होऊ शकतो. समजा तुमच्याजवळ चार खाती आहेत, ज्यात किमान 10 हजार रुपये राखीव असायला हवे. ज्यावर तुम्हाला 4 टक्के व्याज मिळेल. म्हणजे तुम्हाला यावर 1600 रुपये व्याज मिळणार. पण, जर तुम्ही हे निष्क्रिय खाते बंद केले आणि यातील पैसे म्युचूअल फंडमध्ये गुंतवले तर तुम्हाला कमीत कमी 8 टक्के व्याज मिळेल, म्हणजेच 3200 रुपये व्याज मिळेल. त्यामुळे निष्क्रिय खात्यात पैसे पडून राहण्यापेक्षा ते इतर ठिकाणी गुंतवणे कधीही फायद्याचे.

निष्क्रिय खाते असुरक्षित –

अनेक बँकांमध्ये खाते असणे हे सुरक्षेच्या दृष्टीनेही धोकादायक आहे. कारण आजकाल सर्वच नेट बँकिंगचा वापर करतात. अशावेळी निष्क्रिय खात्याचा कुठल्या फसवणुकीसाठी वापर केला जाऊ शकतो. यापासून वाचण्यासाठी निष्क्रिय खाते बंद करा आणि नेट बँकिंग डिलीट करा.

आयकर भरतानाही समस्या उद्भवू शकतात –

एकाहून अधिक बँकांमध्ये खाते असल्याने आयकर भरतानाही अनेक समस्या उद्भवतात. कागदोपत्री कारवायांमध्येही त्रास होऊ शकतो. तसेच आयकर भरताना आपल्या सर्व खात्यासंबंधी माहितीची गरज असते. हे सर्व मिळवणे कठिण जाते.

जास्तीचे शुल्कही आकारले जाते –

अनेक खाते असल्याने तुम्हाला वर्षाला मेंटेनन्स शुल्क आणि सर्व्हिस शुल्कही भरावे लागतात. क्रेडिट-डेबिट कार्ड तसेच इतर सुविधांसाठीही बँक तुमच्याकडून शुल्क आकारत असते. निष्क्रिय खातं असलं तरी तुम्हाला त्या खात्याचेही शुल्क भरावे लागेल.

त्यामुळे हे निष्क्रिय खाते आपले केवळ नुकसानच करतं, त्याने तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही. त्यामुळे हे खाते लगेच बंद करा.

Published On - 4:03 pm, Mon, 11 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI