Good News : यंदा ‘या’ क्षेत्रांमध्ये आहेत नोकरीच्या उत्तम संधी, पगार आणि बोनस दोन्ही वाढणार

देशात नवीन रोजगार येत असून कर्मचार्‍यांचे पगारही वाढण्याची शक्यता आहे.

Good News : यंदा 'या' क्षेत्रांमध्ये आहेत नोकरीच्या उत्तम संधी, पगार आणि बोनस दोन्ही वाढणार
Follow us
| Updated on: Jan 22, 2021 | 10:13 AM

मुंबई : कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गामुळे 2020 सगळ्यांसाठीच आर्थिकदृष्ट्या कठीण गेलं. या काळात लाखो लोकांनी नोकर्‍या गमावल्या. पण 2021 ची सुरुवात ही कोरोना लसीने झाल्यामुळे सगळं काही पुन्हा सुरळीत होताना दिसत आहे. अशात आता नोकरीच्याही उत्तम संधी चालून आल्या आहेत. देशात नवीन रोजगार येत असून कर्मचार्‍यांचे पगारही वाढण्याची शक्यता आहे. (good news this financial year bumper job opening indian companies and salary hike and bonus to hire more people in 2021)

एका सर्वेक्षणानुसार, 2021 मध्ये अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढवणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल 60 टक्के कंपन्यांना वेतनवाढीसह बोनस देण्याच्या विचारात आहे. इतकंच नाहीतर सर्वेक्षण केलेल्या 30 टक्के कंपन्या अजूनही कर्मचाऱ्यांना लाभ द्यायचा की नाही यावर विचार करत आहेत.

नवीन वर्षात नोकरीच्या उत्तम संधी

ईटी मायकेल पेज टॅलेंट ट्रेंड्स 2021 च्या मते, 53 टक्के कंपन्यांना यावर्षी नवीन लोक नोकरीसाठी घेण्याचा विचार करत आहे. यासाठी आशिया-पॅसिफिकच्या 12 बाजारात केलेल्या सर्वेक्षणातून अहवालाचा निकाल घेण्यात आला आहे. यामध्ये 5,500 हून अधिक व्यापारी आणि 21,000 कर्मचारी आहेत, त्यापैकी 3,500 पेक्षा अधिक संचालक किंवा सीएक्सओ यांचा समावेश आहे.

खरंतर, गेल्या वर्षामध्ये नोकऱ्यांमध्ये 18 टक्के घट झाल्याचं पाहायला मिळालं तर आता 53 टक्के कंपन्या यंदा भारतात नवीन लोकांना कामावर घेण्याचा प्रयत्नात आहे. ईटीच्या दुसर्‍या अहवालानुसार टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजी आणि विप्रो या चार आयटी कंपन्या यावर्षी 91 हजार लोकांना नोकर्‍या उपलब्ध करुन देऊ शकतात.

सर्वेक्षण अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार, 55 टक्के कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांना बोनस देणार असून. त्यापैकी 44 टक्के लोकांना कामगारांना महिन्याच्या पगारापेक्षा जास्त पगार बोनस म्हणून देण्याचाही विचार आहेत. तर 46 टक्के लोकांना बोनसमध्ये एक महिना किंवा त्याहून कमी देण्यात येईल.

कुठल्या क्षेत्रात किती वाढेल पगार ?

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, वेतनवाढीचा दर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आणि कंपन्यांमध्ये भिन्न आहे. पगाराची सर्वाधिक वाढ आरोग्य सेवा क्षेत्रात अपेक्षित आहे. ही सरासरी 8 टक्के असू शकते. यानंतर एफएमसीजी क्षेत्रातील वेतन 7.6 टक्के आणि ई-कॉमर्स / इंटरनेट सेवा क्षेत्रात 7.5 टक्के, तंत्रज्ञानात 7.3 टक्के आणि बँकिंग आणि वित्त सेवांमध्ये 6.8 टक्के वाढ होऊ शकते.

यासोबतच व्यावसायिक क्षेत्रामध्ये 7.7 टक्के, किरकोळ क्षेत्रात 6.1 टक्के, वाहतूक व वितरणात 6 टक्के, औद्योगिक व उत्पादन क्षेत्रात 9.9 टक्के, नैसर्गिक संसाधने व उर्जेतील 9.9 टक्के आणि बांधकाम क्षेत्रातील 5.3 टक्के आर्थिक नफा होण्याची शक्यता आहे. (good news this financial year bumper job opening indian companies and salary hike and bonus to hire more people in 2021)

संबंधित बातम्या – 

IBPS Office Assistant Result 2020: आयबीपीएस ऑफिस असिस्टंट परीक्षेचा निकाल जाहीर

India Post GDS 2021: पोस्ट खात्यातील 4269 पदांसाठी अर्ज करण्याकरिता मुदतवाढ; इथे करा अर्ज

Logo Contest | सरकारचे ‘एक’ काम करा नि हजारो रुपये जिंकण्याची संधी मिळावा!

(good news this financial year bumper job opening indian companies and salary hike and bonus to hire more people in 2021)

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.