BHC Recruitment 2021 : मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी, सिस्टम अधिकारी पदावर रिक्त पदांसाठी भरती

जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार एकूण 40 पदांसाठी भरती करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. (Job Opportunity in Mumbai High Court, Recruitment for Vacancies in the post of System Officer)

BHC Recruitment 2021 : मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी, सिस्टम अधिकारी पदावर रिक्त पदांसाठी भरती
मुंबई उच्च न्यायालय

BHC Recruitment 2021 मुंबई : महाराष्ट्रात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्यातील जिल्हा व तालुका न्यायालयांची रिक्त पदे भरण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने (BHC) अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार वरिष्ठ प्रणाली अधिकारी व यंत्रणा अधिकारी पदावर कॉन्ट्रॅक्टवर भरती करण्यात येणार आहे. जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार एकूण 40 पदांसाठी भरती करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात (BHC Recruitment 2021) उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 27 मे 2021 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या पदांवर भरतीसाठी देण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार अर्जाची तारीख संपल्यानंतर अर्जाची विंक वेबसाइटवरून काढून टाकली जाईल. यामुळे अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार अधिकृत अधिसूचना तपासल्यानंतर अर्ज करू शकतात. यात अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट bombayhighcourt.nic.in वर जावे लागेल. (Job Opportunity in Mumbai High Court, Recruitment for Vacancies in the post of System Officer)

BHC Recruitment 2021 भरतीचा तपशील

मुंबई हायकोर्टाने (BHC) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट bombayhighcourt.nic.in वर भेट द्यावी लागेल. यात (BHC Recruitment 2021) एकूण 40 पदांवर भरती होईल. यामध्ये वरिष्ठ सिस्टम अधिकारी पदासाठी 17 आणि सिस्टम अधिकारी पदासाठी 23 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

पगाराचा तपशील

सीनियर सिस्टम ऑफिसर – 46,000 रुपये
सिस्टम ऑफिसर – 40,000 रुपये

कोण अर्ज करू शकेल?

अधिसूचनेनुसार वरिष्ठ प्रणाली अधिकारी पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संगणक विज्ञान अभियांत्रिकी व माहिती तंत्रज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतलेली असली पाहिजे. तसेच, संगणक विज्ञान अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीमध्ये बीई, बीटेक पदवी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवारांचे कमाल वय 40 वर्षे निश्चित केले गेले आहे. (Job Opportunity in Mumbai High Court, Recruitment for Vacancies in the post of System Officer)

इतर बातम्या

पीएम केअरमधून पुरवलेल्या व्हेंटिलेटरची केंद्र अन् राज्य सरकारने संयुक्त तपासणी करा: सचिन सावंत

VIDEO: नाशिकच्या बिटको रुग्णालयात राडा, भाजप नगरसेविकेच्या पतीकडून तोडफोड करत अधिकाऱ्यांना शिवीगाळ

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI