LIC AAO Admit Card 2021: एलआयसीकडून एएओ परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर, ‘या’ तारखेला परीक्षा

लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्यावतीनं सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आणि सहाय्यक अभियंता पदासाठी भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जारी करण्यात आलं आहे. या परीक्षांची उमेदवारांकडून बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा केली जात होती.

LIC AAO Admit Card 2021: एलआयसीकडून एएओ परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर, 'या' तारखेला परीक्षा
आता पॅन एलआयसी पॉलिसीलाही लिंक करावे लागणार

नवी दिल्ली: लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्यावतीनं सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आणि सहाय्यक अभियंता पदासाठी भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जारी करण्यात आलं आहे. या परीक्षांची उमेदवारांकडून बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा केली जात होती. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला होता ते अधिकृत वेबसाइट- licindia.in ला भेट देऊन प्रवेशपत्र (LIC AAO Admit Card 2021) डाउनलोड करू शकतात.

परीक्षा 28 ऑगस्टला

एलआयसीच्या वतीनं सहायक प्रशासकीय अधिकारी पदासाठी अर्ज प्रक्रिया 25 फेब्रुवारी 2020 रोजी सुरू झाली होती. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2020 होती. कोरोना विषाणूमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परीक्षा होऊ शकली नाही. आता प्रवेशपत्र (LIC AAO Admit Card 2021) अधिकृत वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहे. या भरतीद्वारे एकूण 218 पदं भरली जाणार असून 28 ऑगस्ट 2021 रोजी घेतली जाणार आहे.

प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे

स्टेप 1: प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम LIC च्या अधिकृत वेबसाइट, licindia.in ला भेट द्या.
स्टेप 2: वेबसाइटच्या होमपेजवर असलेल्या करिअर टॅबवर क्लिक करा
स्टेप 3: सहाय्यक अभियंता आणि सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (विशेषज्ञ) – 2020 च्या भरती येथे क्लिक करा.
स्टेप 4: परीक्षा सुरु होण्याच्यात तारखांच्या तपशिलावर क्लिक करा
स्टेप 5: लॉगीन डिटेल्स, नोंदणी क्रमांक सबमिट करा.
स्टेप 6: सबमिट केल्यानंतर प्रवेशपत्र ओपन होईल.
स्टेप 7: प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि प्रिंट आउट घ्या.

पदांचा तपशील

एलआयसीतर्फे एकूण 218 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये सहाय्यक अभियंत्यासाठी 50 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. 29 जागा सहाय्यक अभियंता सिव्हिल साठी, सहाय्यक अभियंता इलेक्ट्रिकल साठी 10, सहाय्यक अभियंता आर्किटेक्ट साठी 4, सहाय्यक अभियंता मेकॅनिकल साठी 3, सहाय्यक अभियंता स्ट्रक्चरल साठी 4 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्याच सहाय्यक प्रशासकीय अधिकाऱ्यासाठी एकूण 168 जागा असतील.

वयोमर्यादा आणि पात्रता

एलआयसीनं जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त आणि 30 वर्षांपेक्षा कमी असावं, असं सांगण्यात आलं होतं. अधिक माहितीसाठी, आपण अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध सूचना पाहू शकता.

इतर बातम्या:

JEE Main 2021 : जेईई मेन्सच्या अंतिम सत्राची परीक्षा 26 ऑगस्टपासून सुरू होणार, लवकरच जारी करणार अॅडमिट कार्ड

AIL Recruitment 2021: एयर इंडियामध्ये असिस्टंट मॅनेजर पदावर भरती, अर्ज कसा करायचा?

LIC AAO Admit Card 2021 released for Assistant Engineer and Assistant Administrative Officer Post check details here

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI