नौदलातील SSR आणि AA पदांसाठी मेगाभरती, पात्रता, निवडपध्दत जाणून घ्या

नौदलातील SSR आणि AA पदांसाठी मेगाभरती, पात्रता, निवडपध्दत जाणून घ्या
Indian Navy मध्ये भरती होण्याची मोठी संधी
Image Credit source: twitter

तरुणांसाठी भारतीय नौदलात सहभागी होण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. ताज्या माहितीनुसार नौदलात आर्टिफिशर अप्रेंटिसच्या 500 आणि सिनिअर सेकेंड्री रिक्रूट्सपदासाठी 2,000 पदांसाठी मेगा भरती सुरू आहे. इच्छुक उमेदवार या भरतीसाठी 5 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.

दादासाहेब कारंडे

|

Mar 30, 2022 | 10:13 PM

भारतीय नौदलात भरती होण्याची इच्छा असलेल्यांसाठी एक सुवर्णसंधी वाट पाहत आहे. नौदलातील आर्टिफिशर अप्रेंटिस (AA) आणि सिनिअर सेकेंड्री रिक्रूट्स (SSR) च्या ऑगस्ट 2022 मध्ये सुरु होत असलेल्या बॅचसाठी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यात एकूण 2500 पदांची भरती केली जाईल. या 2500 पदांमध्ये ‘एए’च्या 500 आणि ‘एसएसआर’च्या 2000 पदांचा समावेश आहे. भरतीसाठी इच्छूक असलेले आणि पात्र उमेदवार 5 एप्रिल 2022 पर्यंत नौदलाच्या (Navy) अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी इतर कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत असाल, तर तुम्ही सक्सेस डॉट कॉमवर चालणाऱ्या अनेक खास बॅचेस आणि मोफत अभ्यासक्रमांची मदत घेत आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी अधिक जोमाने करु शकतात. जवळपास सर्व स्पर्धा परीक्षांसाठी या ठिकाणी अनेक मोफत वर्गही चालवले जात आहेत. Exam Preparation FREE Course- Subscribe Now या लिंकवर क्लिक करुन मोफत क्लासचा लाभ मिळवू शकतात.

दरम्यान, या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज प्रथम निवडले जातील आणि एकूण रिक्त पदांच्या चार पट उमेदवारांना लेखी चाचणी आणि शारीरिक चाचणीसाठी बोलावले जाणार आहे. त्यानंतर, नौदल लेखी परीक्षेच्या निकालावर आधारित ऑल इंडिया मेरिट लिस्ट तयार करेल आणि त्याच यादीतील उमेदवारांना वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले जाईल. अधिकृत अधिसूचनेनुसार, नौदल AA च्या पदांसाठी 600 उमेदवारांना गुणवत्ता यादीत आणि SSR च्या पदांसाठी 2500 उमेदवारांना गुणवत्ता यादीत ठेवू शकते.

अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता

आर्टिफिसर अप्रेंटिसच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी 12वी परीक्षा मान्यताप्राप्त बोर्डातून 60 टक्के गुणांसह गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणकशास्त्र या विषयांपैकी एक विषयासह उत्तीर्ण केलेली असावी. त्याच वेळी, वरिष्ठ माध्यमिक भरतीसाठी बी उमेदवारांसाठी वरील विषयांसह 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मात्र, बारावीत किमान 60 टक्के गुण असणे बंधनकारक नाही. या दोन्ही पदांसाठी, उमेदवारांचा जन्म 1 ऑगस्ट 2002 पूर्वी झालेला नसावा आणि 31 जुलै 2005 नंतर झालेला नसावा.

नोकरीचे स्पप्न ‘सफलता’ने पूर्ण करा

सरकारी नोकरीचे स्वप्न पाहत असाल तर तुम्ही safalta अॅप एकदा डाऊनलोड करून यशस्वीपणे चालवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांचा लाभ घेता येउ शकतो. सध्या यूपी लेखपाल, यूपी कॉन्स्टेबल, रेल्वे ग्रुप डी आणि इतर अनेक स्पर्धा परीक्षांसह एसएससी आणि रेल्वेच्या विविध परीक्षांमध्ये यश मिळवून विशेष अभ्यासक्रम चालवले जात आहेत. या अभ्यासक्रमांच्या मदतीने तुम्ही तुमची उर्वरित तयारी पूर्ण करू शकता.

कल्याण पंचायत समितीत भाजपाच्या रेश्मा भोईर यांची सभापती पदी बिनविरोध निवड

नाणारला टोकाचा विरोध करणाऱ्या शिवसेनेनं भूमिका का बदलली? नितेश राणेंचा सवाल, 7/12 तपासण्याचाही इशारा

स्वतःचीच आरती स्वतःच ओवाळून घेतली, Anil Bonde यांचा शरद पवार यांच्यावर घणाघात

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें