UPSC Mains 2021 : यूपीएससीकडून नागरी सेवा मुख्य परीक्षेचं जानेवारीमध्ये आयोजन? DAF अर्ज लवकरच जाहीर होणार

यूपीएससीकडून जारी करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार मु्ख्य परीक्षा 7 जानेवारी ते 16 जानेवारी 2022 दरम्यान आयोजित केली जाईल. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून यासंदर्भात लवकरच नोटिफिकेशन वेबसाईटवर जारी केलं जाणार आहे.

UPSC Mains 2021 : यूपीएससीकडून नागरी सेवा मुख्य परीक्षेचं जानेवारीमध्ये आयोजन? DAF अर्ज लवकरच जाहीर होणार
यूपीएससी
Follow us
| Updated on: Nov 16, 2021 | 10:29 AM

नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून नागरी सेवा मुख्य परीक्षेचं आयोजन जानेवारी 2022 मध्ये केलं जाणार आहे. यूपीएससीकडून जारी करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार मुख्य परीक्षा 7 जानेवारी ते 16 जानेवारी 2022 दरम्यान आयोजित केली जाईल. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून यासंदर्भात लवकरच नोटिफिकेशन वेबसाईटवर जारी केलं जाणार आहे.

यूपीएससीनं जारी केलेल्या नागरी सेवा परीक्षेच्या सविस्तर माहितीपत्रकात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. जे विद्यार्थी किंवा उमेदवार नागरी सेवा पूर्व परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत त्यांना मुख्य परीक्षेसाठी अर्ज दाखल करावा लागणार आहे. मुख्य परीक्षेसाठी सादर करण्यात येणाऱ्या अर्जाला यूपीएससीकडून डीटेल्ड अ‌ॅप्लिकेशन फॉर्म-1 असं म्हटलं जाते. डीएफमध्ये विद्यार्थ्यांना जन्म तारीख, जात प्रमाणपत्र, सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रांच्या स्कॅन कॉपीज अपलोड कराव्या लागतात. मुख्य परीक्षेसाठी निर्धारित करण्यात आलेलं शुल्क देखील विद्यार्थ्यांना भरावं लागेल.

DAF म्हणजे काय?

यूपीएससी नागरी सेवा परीक्षेच्या प्रक्रियेदरम्यान विविध टप्प्यावर उमेदवारांकडून अर्ज दाखल करुन घेते. पूर्व परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. तर, मुख्य परीक्षेसाठी डीटेल्ड अ‌ॅप्लिकेशन फॉर्म सादर करावा लागतो. तर, मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी डीएफ-2 अर्ज सादर करावा लागतो. यासाठी उमेदवारांकडून शुल्क आकारण्यात येत नाही. मुलाखतीच्या अर्जात उमेदवारांना त्यांचे प्राधान्यक्रम विचारले जातात. यामध्ये आयएएस, आयपीएस, आयएफएस या सेवांचे पर्याय उपलब्ध असतात.

DAF कधी जारी होणार?

यूपीएससीकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्य परीक्षेसाठी डीएएफ लवरकरच जाहीर केला जाणार आहे. नोव्हेंबर 2021 च्या अखेरच्या आठवड्यात डीएफ लिंक अॅक्टिव्ह केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, यूपीएससीकडून यासंदर्भातील अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. उमेदवारांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

इतर बातम्या:

CBSE Term 1 Exam : CBSE टर्म 1 परीक्षेत MCQ सोडवण्यासाठी टिप्स आणि ट्रिक्स

Z. P. च्या विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालेच नाही, दिवाळीनंतर झाल्या शाळा सुरू

IIT Bombay: आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी, डिसेंबरपासून कॅम्पसमध्ये ऑफलाईन शिक्षण सुरु

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.