AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bulli Bai | ट्विटरवर फेक अकाऊंट, बुल्लीबाई अॅप प्रकरणात 18 वर्षाची तरुणी मास्टरमाईंड ? पोलिसांनी बेड्या ठोकल्या

बुल्ली बाई अॅप प्रकरणी बंगळुरु येथून 21 वर्षीय इंजिनिअर तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केलं आहे. दरम्यान, या तरुणाच्या चौकशीतून आणखी धक्कादायक खुलासे होत आहे. या प्रकरणात 18 वर्षाची श्वेता सिंग या तरुणीचे नाव आता समोर आले आहे. हीच तरुणी बुल्लीबाई अॅपमध्ये मास्टरमाईंड असल्याचा संशल मुंबई पोलिसांना आहे

Bulli Bai | ट्विटरवर फेक अकाऊंट, बुल्लीबाई अॅप प्रकरणात 18 वर्षाची तरुणी मास्टरमाईंड ? पोलिसांनी बेड्या ठोकल्या
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 05, 2022 | 9:39 AM
Share

Bulli Bai | बुल्लीबाई आणि सुल्ली डील या अॅपवर मुस्लीम महिलांचे फोटो टाकून त्यांची बोली लावली जात असल्याचा प्रकार समोर येताच संपूर्ण भारतात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बंगळुरु येथून 21 वर्षीय इंजिनिअर तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केलं आहे. दरम्यान, या तरुणाच्या चौकशीतून आणखी धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणात 18 वर्षाची श्वेता सिंग या तरुणीचे नाव आता समोर आले आहे. हीच तरुणी बुल्लीबाई अॅप प्रकरणात मास्टरमाईंड असल्याचा संशय पोलिसांना आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.

18 वर्षीय तरुणी बुल्लीबाई अॅपमध्ये मास्टरमाईंड ?

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी श्वेता सिंग या 18 वर्षीय तरुणीला अटक केलं आहे. ही तरुणी नुकतीच इयत्ता बारावी उत्तीर्ण झाली आहे. विशेष म्हणजे ती इंजिनिअर प्रवेश परीक्षेची तयारी करत आहे. तिला पोलिसांनी उत्तराखंड येथील उधमसिंह नगर जिल्ह्यातून अटक केलं आहे. मुंबई पोलिसांनी बंगळुरु येथून अटक केलेल्या 21 वर्षीय तरुणाच्या चौकशीतून पोलिसांना या तरुणीची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतलं आहे. पोलीस या मुलीची अधिक चौकशी करत आहेत.

ट्विटरवर फेक अकाऊंट, नेपाळमधील तरुणाशी संपर्क

पोलिसांनी बुल्लीबाई अॅपमधील कथित मास्टरमाईंड श्वेता सिंह या तरुणीची चौकशी केली आहे. या चौकशीत पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे. श्वेता सिंग नेपाळमधील एक तरुण तसेच मागील सहा महिन्यांपासून बुल्लीबाई अॅपशी संबंधित काही लोकांच्या संपर्कात होती. त्यांच्या सूचनेनुसार श्वेता सिंगने ट्विटरवर एक फेक अकाऊंट तयार केले होते. बुल्लीबाई अॅपवर अपलोड केले जाणारे मॉर्फ फोटो तसेच इतर कन्टेंट या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले जायचे. ट्विटवर फेक अकाऊंट सुरु केल्याचे सिंग या तरुणीने मान्य केल्याची माहिती मिळतेय.

नेपाळमधील तरुणाकडून सूचना दिल्या जायच्या

तरुणीने तिचा सोशल मीडियावर एक मित्र असल्याचे मान्य केले आहे. हा मित्र मूळचा नेपाळ येथील असून त्याच्याकडून तिला वेगवेगळ्या सूचना दिल्या जायच्या. या तरुणाचे नाव जीयू (Giyou) असल्याची माहिती उत्तराखंड पोलिसांनी दिलीय. तसेच बुल्लीबाई अॅपवर अपलोड होणारे कन्टेंट नंतर तिने सुरु केलेल्या ट्विटरच्या फेक अकाऊंटवर टाकण्याचे तिला सांगण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले आहे.

इतर बातम्या :

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर यांच्यासह भावावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा, फसवणूक केल्याचाही आरोप

Sindhutai Sapkal Death | दुपारी 12 वाजता सिंधुताई सपकाळ यांच्यावर अंत्यसंस्कार, पुण्यात 2 तास अंत्यदर्शन

Uday Samant : विद्यापीठ, कॉलेज पुन्हा ऑनलाईन? उदय सामंत निर्णय जाहीर करणार

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.