AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अपघात वार, राज्यात विविध अपघातात 7 ठार, 8 जखमी

राज्यासाठी आजचा दिवस अत्यंत दुर्देवी ठरला आहे. (7 dead and 8 injured in road accident in maharashtra)

अपघात वार, राज्यात विविध अपघातात 7 ठार, 8 जखमी
road accident
| Updated on: Apr 25, 2021 | 10:52 AM
Share

सातारा: राज्यासाठी आजचा दिवस अत्यंत दुर्देवी ठरला आहे. राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण जखमी झाले आहेत. सातारा, औरंगाबाद आणि शहापूरमध्ये या दुर्देवी घटना घडल्या आहेत. (7 dead and 8 injured in road accident in maharashtra)

सातारा जिल्हयातल्या जावली तालुक्यातील मेरुलिंग घाटात आज सकाळी 7:45 वाजण्याच्या सुमारास इंडिगो कारच्या झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार तर 5 जण जखमी झाले आहेत. शिवाजी जगन्नाथ साबळे (वय 40), लिलाबाई गणपत साबळे (वय 55) आणि सागर सर्जेराव साबळे (वय 32) आदी अपघातातील मृतांची नावं आहेत. मेरुलिंग येथून रेशनिंग आणण्यासाठी जात असताना मेरुलिंग घाटातील एका वळणावर चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने गाडी पलटी झाली. त्यात या तिघांचा मृत्यू झाला असून अपघातातील जखमींना मेढा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

अरुंद रस्त्याने घात केला

दुसरा अपघात औरंगाबाद येथील प्रसिद्ध दौलताबाद किल्ल्यासमोर घडला. किल्ल्यासमोर दोन कारची समोरासमोर धडक झाली. किल्ल्यासमोर अरुंद रस्ता असल्याने हा अपघात झाला. त्यामुळे अपघतात तीनजण ठार झाले, तर दोन जण जखमी झाले. दीपक खोसरे, मदन जगताप आणि राजू मानकीकर अशी अपघातातील मृतांची नावं आहेत. तर अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

कुणीतरी पाठलाग करत असल्याच्या भीतीने अपघात

शहापूर येथे मुंबई – नाशिक महामार्गावर कसाऱ्या जवळ गोमांस घेऊन जाणाऱ्या कारचा अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. तसेच कारमधील एक जण फरार झाला आहे. नाशिकहून मुंबईच्या दिशेने एमएच 14 डिए 9096 क्रमांकाची टोयोटा इटोस गाडीतून जवळपास दीड टन गोमांस घेऊन नेलं जात होतं. कसाऱ्याजवळ भरधाव वेगाने निघालेल्या कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी दोन्ही लेनमधील डिव्हायडरवर जाऊन आदळली व पलटी झाली. कार पलटी होताच गाडीच्या डिकीमधून गोमांस रस्त्यावर पडले.

आपला कुणीतरी पाठलाग करतोय या भीतीने वाहन चालकाने गाडी भरधाव वेगाने पळवत नेल्याने हा अपघात झाला असल्याचे समजते. या अपघातात इम्रान शेख गंभीर जखमी झाला असून हमीद शेख याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. यातील एकजण फरार झाला असल्याचे घटनास्थळी असलेल्या स्थानिक नागरिकांनी सांगितले. यावेळी कसारा गावातील तरुण सद्दाम सारंग, नजीर शेख यांनी इतर तरुणांच्या मदतीने जखमींना खर्डी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, जखमींची प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्यांना शहापूर येथील सय्यद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना इम्रान शेख याचा मृत्यू झाला. (7 dead and 8 injured in road accident in maharashtra)

संबंधित बातम्या:

हायवेच्या कडेला पीपीई किटमध्ये मृतदेह, महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय?

43 कोटींच्या बंगल्यात फुकटात लग्न उरकण्याचा प्लॅन, पोलिसांकडून जोडप्याची ‘वरात’

अकोल्यात पूर्ववैमनस्यातून 24 वर्षीय तरुणाची हत्या, दोघे ताब्यात

(7 dead and 8 injured in road accident in maharashtra)

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.