अकोल्यात पूर्ववैमनस्यातून 24 वर्षीय तरुणाची हत्या, दोघे ताब्यात

विशेष म्हणजे मागील वर्षीच्या रमजान महिन्यातही याच ठिकाणी अशाच प्रकारे हत्येची घटना घडली होती. (Akola Crime man Murder )

अकोल्यात पूर्ववैमनस्यातून 24 वर्षीय तरुणाची हत्या, दोघे ताब्यात
अकोट शहरात तरुणाची धारदार शस्त्राने हत्या
Follow us
| Updated on: Apr 22, 2021 | 3:13 PM

अकोला : पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यात उघडकीस आली आहे. धारदार शस्त्रांनी वार करुन 24 वर्षीय तरुणाला जीवे मारण्यात आलं. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.  (Akola Crime 24 Years old man Murder in Akot City)

अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातील अकबरी प्लॉटमध्ये युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अकबरी प्लॉटमधील काही युवकांनी पूर्ववैमनस्यातून 24 वर्षीय अब्दुल सलमान अब्दुल राजिक याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला.

गेल्या वर्षीही रमजानमध्ये याच ठिकाणी हत्या

हल्ल्यात अब्दुलचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अकोट शहर पोलीस यांनी घटनास्थळावर जाऊन चौकशी केली आणि दोघांना ताब्यात घेतले. अब्दुल सलमान याची हत्या जुन्या वादातून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीच्या रमजान महिन्यातही याच ठिकाणी अशाच प्रकारे हत्येची घटना घडली होती.

अकोला शहरात युवकाचा संशयास्पद मृत्यू

अकोला शहरात 30 ते 35 वर्षीय युवकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने काही दिवसांपूर्वी खळबळ उडाली होती. रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतल्या जठारपेठ भागातील फडके हॉस्पिटलच्या गल्लीत हा युवक मृतावस्थेत सापडला होता. सौरभ सुळे हा दुपारीच हेअरकट करण्यासाठी जातो, असं सांगून घराबाहेर पडला होता. मात्र तो रात्री उशिरापर्यंत घरी परतलाच नाही

तीन तासांनंतरही पोलीस घटनास्थळी नाहीत

अकोला शहरातल्या रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील फडके हॉस्पिटलच्या गल्लीत रात्रीच्या सुमारास एक युवक पडलेला असल्याचे काही जणांना दिसले. त्यांनी लगेच पोलिसांना याची माहिती दिली. पण तीन तास होऊनही याठिकाणी पोलीस पोहचले नव्हते. त्यामुळे मृतदेह त्याच ठिकाणी पडून होता.

मृतदेहाजवळ बघ्यांची गर्दी

तीन तासानंतर रामदासपेठ पोलीस त्या ठिकाणी पोहचले. मृतदेह सापडल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने बघ्यांनी एकच गर्दी केली होती. या युवकाची ओळख पटली असून त्याच भागात अन्नपूर्णा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सौरभ सुळेचा मृतदेह असल्याचं समोर आलं आहे.

संबंधित बातम्या :

नागपुरात ‘लेडी डॉन’ची हत्या, भरचौकात चाकूचे सपासप वार

‘क्राईम पेट्रोल’मधील किस्से सांगून आत्महत्येचा भास, 28 वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी भाऊ-वडील गजाआड

(Akola Crime 24 Years old man Murder in Akot City)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.