वहिनीच्या प्रेमात होता दीर! नंतर दोघांनी मिळूनच रचला कट, पतीने व्हॉट्सअॅप चॅट वाचले अन्…
दिल्लीतून एक खळबळजनक घटनेचा खुलासा झाला आहे. येथे एका महिलेचे तिच्या चुलत दिरासोबत प्रेमसंबंध होते. पती मार्गात अडथळा ठरत असल्याने पत्नीने चुलत दिरासोबत मिळून त्याची हत्या केली. या दोघांच्या कृत्याचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा एक व्हॉट्सअॅप चॅट समोर आले.

दिल्लीच्या उत्तम नगर परिसरात करण देव याचा करंट लागल्याने झालेल्या मृत्यूच्या घटनेला आता नवं वळण आलं आहे. पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे की हा कोणताही अपघात नव्हता, तर एक सुनियोजित हत्या होती आणि यामध्ये करणची पत्नी आणि तिच्या कथित प्रेमीचा हात आहे. हा प्रेमी दुसरा कोणी नसून, पत्नीचा चुलत दिरच आहे.
नेमकं काय झालं?
माहितीनुसार, 13 जुलै रोजी करण देव याला करंट लागल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी करणला मृत घोषित केलं. सुरुवातीला कुटुंबीयांनी या मृत्यूला अपघात मानून शवविच्छेदनास नकार दिला. परंतु, वय आणि परिस्थिती पाहता पोलिसांनी खबरदारी म्हणून शवविच्छेदन केलं.
वाचा: सुंदर होती मुलाची बायको, प्रेमात पडला सासरा… मुलाला कळताच जे झालं पोलिसही हादरले
16 जुलै रोजी करणचा भाऊ कुणाल पोलिसांकडे पोहोचला आणि त्याने हत्येचा संशय व्यक्त केला, तेव्हा या प्रकरणाने वेग घेतला. पोलिसांनी तपास केला तेव्हा त्यांना मृतकाच्या पत्नीवर संशय आला, त्यानंतर तिची कसून चौकशी करण्यात आली. सूत्रांनुसार, चौकशीदरम्यान मृतकाची पत्नी खचली आणि तिने कबूल केलं की, “माझे माझ्या पतीच्या चुलत भावासोबत प्रेमसंबंध होते. आम्ही मग करणच्या हत्येची योजना आखली.”
पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. सूत्रांनुसार, पोलिसांना संशय आहे की करणला आधी झोपेच्या गोळ्या देण्यात आल्या आणि नंतर करंट लावून त्याची हत्या करण्यात आली. सध्या पोलिस पुरावे गोळा करत आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाची बारकाईने तपासणी करत आहेत. लवकरच सत्य समोर आणण्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
करणच्या भावाला आला संशय
पोलिस सूत्रांनुसार, मृतक करणच्या भावाने त्याच्या चुलत भावाच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप चॅट वाचले, जे करणची पत्नी आणि चुलत भावामध्ये झाले होते. या चॅटमध्ये दोघांनी करणच्या हत्येचा कट रचला होता. यातून हेही स्पष्ट झालं की दोघांमध्ये बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध होते. पोलिसांनी महिलेचा फोन तपासला तेव्हा हे चॅट सापडले. या चॅटच्या आधारे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात हत्येच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलिस चौकशीद्वारे या कटाच्या खोलवर जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
