पती-पत्नी एकमेकांचे शत्रू कधीच नसतात, पण एका छोट्याशा भांडणात मुलं अशी होरपळली जातात…

वैजंता गोगावले, Tv9 मराठी

Updated on: Oct 03, 2022 | 4:29 PM

घटनास्थळाची पाहणी केली असता पोलिसांना घरात स्वतःहून आग लावली असल्याची शंका आली. पोलिसांनी याबाबत सखोल तपास केला असता त्यांचा संशय खरा ठरला.

पती-पत्नी एकमेकांचे शत्रू कधीच नसतात, पण एका छोट्याशा भांडणात मुलं अशी होरपळली जातात...
पती-पत्नीच्या वादातून मुलीला जाळले
Image Credit source: TV9

सुनील जाधव, TV9 मराठी डोंबिवली : कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने पत्नी आणि दोन मुलींना जिवंत जाळल्याची (Burn Alive) घटना डोंबिवलीतील भोपर (Dombivali Bhopar) परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला, तर दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. आरोपी पतीही किरकोळ भाजला आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी मानपाडा पोलीस (Manpada Police) ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवलीतील भोपर परिसरात राहत होते पाटील कुटुंबीय

प्रसाद पाटील असे आरोपी पतीचे नाव आहे. प्रसाद पाटील, त्याची प्रीती पाटील आणि त्यांच्या दोन मुली डोंबिवलीतील भोपर परिसरात राहत होते. प्रसाद आणि प्रीती यांच्यामध्ये नेहमी कौटुंबिक वाद होत होते.

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला संपवण्याचा रचला कट

याच वादातून प्रसादने पत्नी प्रीतीला संपवण्याचा कट रचला. त्यानुसार प्रसादने पत्नीला पेटवले आणि घरात लागून प्रीती आगीत जळाल्याचा बनाव केला. मात्र या आगीत त्यांच्या दोन मुलीही गंभीर भाजल्या आणि प्रसादही किरकोळ भाजला.

शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात केले दाखल

यानंतर प्रसादने आरडाओरडा करत शेजाऱ्यांकडे मदतीसाठी धावा केला. आरडाओरडा ऐकून शेजारी धावत आले आणि त्यांनी सर्वांना तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र पत्नी प्रीतीचा मृत्यू झाला होता तर मुली गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

महिलेच्या भावाच्या तक्रारीवरुन पोलिसात गुन्हा दाखल

घटनास्थळाची पाहणी केली असता पोलिसांना घरात स्वतःहून आग लावली असल्याची शंका आली. पोलिसांनी याबाबत सखोल तपास केला असता त्यांचा संशय खरा ठरला. यानंतर पोलिसांनी मयत महिलेच्या भावाच्या तक्रारीवरुन मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

सध्या दोन्ही मुलींवर आणि किरकोळ भाजलेल्या प्रसादवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रसाद बरा झाल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करतील.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI