AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mangaon Suicide Attempt : बायको येईना सासरी, नवरा चढला टॉवरवरी; पोलिसांच्या शिताफिने तरुणाचे वाचले प्राण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी 4 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्याा सुमारास माणगाव पोलीस ठाणे हद्दीत कोस्ते आदिवासी वाडी येथील एक तरुण टॉवरवर चढला.

Mangaon Suicide Attempt : बायको येईना सासरी, नवरा चढला टॉवरवरी; पोलिसांच्या शिताफिने तरुणाचे वाचले प्राण
बायको येईना सासरी, नवरा चढला टॉवरवरीImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Aug 05, 2022 | 4:15 PM
Share

माणगाव : बायको नांदायला येत नसल्याने तिच्या विरहातून पती (Husband) आत्महत्येसाठी विद्युत टॉवर (Electric Tower)वर चढल्याची घटना माणगाव तालुक्यातील कोस्ते आदिवासी वाडीत घडली आहे. पोलिसांनी तत्परता दाखवून या तरुणाचे प्राण वाचवल्याने पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनिल गोपाळ जाधव (23) असे सदर पतीचे नाव आहे. माणगाव तालुक्याचे उपविभागीय अधिकारी यांनी त्वरीत घटना ठिकाणी धाव घेतली. आत्महत्या (Suicide) करण्यासाठी त्या टॉवरवर चढलेल्या अनिल जाधव याला तुला कोणीही काहीही बोलणार नाही, असा विश्वास देऊन खाली उतरून आत्महत्येपासून परावृत्त केले.

पोलिसांनी अथक प्रयत्नांनी तरुणाला खाली उतरवले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी 4 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्याा सुमारास माणगाव पोलीस ठाणे हद्दीत कोस्ते आदिवासी वाडी येथील एक तरुण टॉवरवर चढला. अनिल गोपाळ जाधव असे त्याचे त्या तरुणाचे नाव असून, पत्नी सोबत नांदण्यास येत नाही म्हणून उच्चदाब विद्युत टॉवरवर आत्महत्या करण्यासाठी चढला. त्यानंतर डीवायएसपी प्रवीण पाटील आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. हा टॉवर म्हसळा डिव्हीजनच्या अधिपत्याखाली येत असल्याने पोलिसांनी म्हसळ्यात फोन लावून टॉवर बंद करण्यास सांगितले. त्यानंतर माणगाव पोलिसांनी त्याच्या पत्नीला घटनास्थळी बोलावून घेतले. टॉवरवर चढलेल्या अनिल जाधव याला अथक प्रयत्नाने खाली आणण्यात माणगाव पोलिसांना यश आले. माणगाव पोलिसांचे सर्वच स्तरावर कौतुक होत आहे. (A youth tries to commit suicide by climbing an electricity tower in Mangaon for his wife)

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.