Abhishek Ghosalkar | गोळ्या संपल्यानंतरही तो अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडत राहिला, जवळच्या व्यक्तीने दिली धक्कादायक माहिती

दहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर आरोपी मॉरिसने स्वत:वरही गोळ्या झाडून घेतल्या. या घटनेत गंभीर जखमी झालेले घोसळकर यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. अभिषेक घोसाळकर यांचे निकटवर्तीय आणि अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणातील साक्षीदाराने यासंदर्भात TV9 ला माहिती दिली

Abhishek Ghosalkar | गोळ्या संपल्यानंतरही तो अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडत राहिला, जवळच्या व्यक्तीने दिली धक्कादायक माहिती
Follow us
| Updated on: Feb 09, 2024 | 9:42 AM

गोविंद ठाकूर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 9 फेब्रुवारी 2024 : दहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर आरोपी मॉरिसने स्वत:वरही गोळ्या झाडून घेतल्या. या घटनेत गंभीर जखमी झालेले घोसळकर यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. तर घोसाळकर यांच्यावर गोळ्या चालवणारा, आरोपी मॉरिस याचाही मृत्यू झाला. दहिसर येथील आयसी कॉलनीतील मॉरिस भाईच्या कार्यालयात गुरुवारी संध्याकाळी हा खळबळजनक प्रकार घडला. या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.

या घटनेनंतर पोलिस कसून तपास करत असून, हा गोळीबार झाला तेव्हा मॉरिसच्या कार्यालयात उपस्थित असलेला आणखी एक इसम मेहुल पारेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. आता या हत्याप्रकरणात आणखी नवी माहिती समोर आली आहे. अभिषेक घोसाळकर यांचे निकटवर्तीय आणि अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणातील साक्षीदार लालचंद पाल यांनी यासंदर्भात TV9 ला माहिती दिली आहे. घोसाळकर यांच्या हत्येपूर्वी पाल हे स्वत: त्यांच्यासोबत होते. मॉरिस यांच्या कार्यालयात जाण्यापूर्वी काय घडले, तसेच गोळीबाराच्या घटनेबद्दलही त्यांनी माहिती दिली. गुरूवारी सकाळी अभिषेक घोसाळकर यांना मॉरिसचा फोन आला तेव्हाही ते सोबतच होते. गोळीबार झाला तेव्हा घटनास्थळीच असलेल्या पाल यांनी तिथे नेमकं काय झालं, तो थरारक अनुभव कथन केला.

नेमकं काय घडलं ?

काल सकाळी अकरा वाजता अभिषेक घोसाळकर यांना मॉरिसचा फोन आला की, संध्याकाळी महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम आहे. पण साडी वाटण्याआधी, मॉरिसने अभिषेकला फेसबुक लाईव्ह करण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये नेले. मी त्यांच्यासोबत होतो, पण आत गेल्यानंतर मॉरिसने मला बाहेर काढले. मग काही वेळाने बंदुकीच्या गोळीचा आवाज आला आणि मी आत धावलो, तर अभिषेक खाली पडला होता आणि मॉरिस त्याच्यावर गोळीबार करत होता. बंदुकीतील गोळी संपल्यानंतर सुद्धा मॉरिस सतत अभिषेकवर गोळीबार करत होता,असं पाल यांनी सांगितलं.

मॉरिस आणि अभिषेकमध्ये आधीच वाद झाला होता, तो संपवण्यासाठी ख्रिसमसच्या वेळी मॉरिसने अभिषेकचे बॅनर पोस्टर लावून जवळीक वाढवल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई पोलिसांनी मॉरिसवर केला गुन्हा दाखल 

दरम्यान घोसाळकर यांच्यावर गोळीबार करणारा आरोपी मॉरिस याच्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हत्या ३०२,आर्म्स ॲक्ट तसेच महाराष्ट्र पोलीस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अभिषेक घोसाळकर यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार घोसाळकर यांच्या छातीच्या डाव्या बाजूला आणि जांघेमध्येही गोळ्या लागल्या होत्या. याप्रकरणी गुन्हे शाखेकडून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर.
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला.
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले...
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले....
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर.
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप...
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप....
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज.
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक.
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा.
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ.
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य.