AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हॅलेन्टाईन डे | एका बागेत पती-पत्नी बसले होते, कार्यकर्त्यांनी प्रेमी समजून मारलं, नंतर कार्यकर्त्यांना फटके

दिल्लीपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या फरीदाबाद परिसरात व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी बजरंग दलाच्य कार्यकर्त्यांनी पार्कमध्ये बसलेल्या एका दाम्पत्याला अविवाहित प्रेमी युगुल समजून मारहाण केली.

व्हॅलेन्टाईन डे | एका बागेत पती-पत्नी बसले होते, कार्यकर्त्यांनी प्रेमी समजून मारलं, नंतर कार्यकर्त्यांना फटके
| Updated on: Feb 15, 2023 | 10:01 PM
Share

नवी दिल्ली : जगभरात 14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेन्टाईन डे’ (valentine day) साजरा केला जातो. व्हेलेन्टाईन डे हा प्रेमी युगुलांसाठी विशेष दिवस असतो. तरुणांपासून, वयस्करांपर्यंतच्या नागरिकांमध्ये या दिवसाची क्रेझ असते. ‘व्हॅलेन्टाईन डे’ हा दिवस प्रेम व्यक्त करण्यासाठीचा किंवा प्रेमदिवस म्हणून सेलिब्रेशसाठीचा अनोखा दिवस मानला जातो. पण भारतात काही संघटनांकडून ‘व्हॅलेन्टाईन डे’ साजरा करण्यास मज्जाव केला जातो. त्यासाठी त्यांच्याकडून आक्रमक पवित्रा देखील घेतला जातो. पण असा आक्रमकपणा, उर्मटपणा आणि दादागिरी करणं काही कार्यकर्त्यांना चांगलंच महागात पडलं आहे. या कार्यकर्त्यांना नागरिकांनी जन्माची अद्दल घडवली आहे.

दिल्लीपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या फरीदाबाद परिसरात व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी बजरंग दलाच्य कार्यकर्त्यांनी पार्कमध्ये बसलेल्या एका दाम्पत्याला अविवाहित प्रेमी युगुल समजून मारहाण केली.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून जोडप्याला मारहाण होताना पाहून तेथील स्थानिकांना धक्का बसला. नेमकं काय प्रकरण आहे? ते समजून घेण्याचा स्थानिकांनी प्रयत्न केला. पण स्थानिकांना जेव्हा समजलं की व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने पार्कात बसलेल्या युगुलांना मारहाण करण्याच्या उद्देशाने पती-पत्नीला मारहाण केलं जातेय, तेव्हा स्थानिकांचा देखील पारा चढला.

स्थानिक नागरिकांनी त्या जोडप्याला मारहाण करणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप दिला. स्थानिकांच्या मारहाणीपासून वाचण्यासाठी बजरंग दलाचे कार्यकर्ते जीव तुटेस्तोर पळत सुटले.

संबंधित घटना कॅमेऱ्यात कैद झालीय. याशिवाय या घटेनेचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहेत. व्हिडीओमध्ये स्थानिक नागरीक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे लाठी-काठ्या घेऊन पळताना दिसत आहेत.

याशिवाय सोशल मीडियावरही बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर आता टीका होत आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी असं कृत्य करणं चुकीचं आहे. त्यामुळे त्यांच्या कृत्याचा निषेध अनेकांकडून केला जातोय. विशेष म्हणजे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या अशाप्रकारच्या वागणुकीची ही पहिली घटना नाही. याआधीदेखील अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत.

गुजरातमध्येही असाच प्रकार

दरम्यान, गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगर शहरातही असाच काहीसा प्रकार घडला आहे. व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी गांधीनगरमधील एका पार्कात बसलेल्या जोडप्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्याची बातमी समोर आली आहे. सेंट्रल विस्टा गार्डन येथे संबंधित घटना घडली. या घटनेचा देखील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

विशेष म्हणजे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून अशाप्रकारे दादागिरी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील प्रेमी युगुल पाहिलं की दादागिरी करण्याचे प्रकार समोर आले आहेत. मध्यंतरी प्रेमी युगुल पाहिलं की त्यांचं लग्न लावण्याचादेखील प्रकार समोर आला होता.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.