AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊन काळात पुणेकर नवरोबांना बायकांचा भलता त्रास, पुण्यात दीड हजार तक्रारी!

वर्क फ्रॉम होममुळे पुरुषांना बायकांच्या छळाला सामोरं जावं लागतंय. बायकोकडून नवऱ्याला मारहाण, मानसिक आणि शारिरिक छळाचे प्रकार वाढले आहेत. पुण्यातील जवळपास दीड हजार नवरोबांनी पोलिसांत बायकांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. (between corona Lockdown men in Family Dispute pune)

लॉकडाऊन काळात पुणेकर नवरोबांना बायकांचा भलता त्रास, पुण्यात दीड हजार तक्रारी!
फोटो : प्रतिकात्मक
| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 11:17 AM
Share

पुणे :  गेली जवळपास दीड वर्ष कोरोना ठाण मांडून बसलाय. तो जायचं काही नाव घेईना. त्याच्यात शासन वारंवार लॉकडाऊनचा निर्णय घेत आहेत. अशा काळात घरातून काम केल्यावाचून पर्याय नाही. देशाच्या विविध भागांत लोक वर्क फ्रॉम होम करतायत. पुण्यात तर मोठा औद्योगिक पट्टा आहे. हिंजवडीसारखं देशातलं मोठं आयटी पार्क आहे. त्यामुळे पुणे शहरात वर्क फ्रॉम होम करणारांची संख्याही मोठी आहे. परंतु आता याच वर्क फ्रॉम होममुळे पुरुषांना बायकांच्या छळाला सामोरं जावं लागतंय. बायकोकडून नवऱ्याला मारहाण, मानसिक आणि शारिरिक छळाचे प्रकार वाढले आहेत. पुण्यातील जवळपास दीड हजार नवरोबांनी पोलिसांत बायकांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. (between corona Lockdown men in Family Dispute pune)

‘पुणे पोलिसांचा भरोसा कक्ष’

पुणे पोलिसांचा भरोसा कक्ष आहे. या कक्षात जवळपास दीड हजारांहून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये बायका मानसिक, शारिरिक छळ करत असल्याचं नवरोबांनी नमूद केलंय. टाळेबंदीच्या काळात जवळपास 3 हजारांहून अधिक तक्रारी दाखल आहेत. त्यातील जवळपास दीड हजार नवरोबांनी बायकांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.

कौटुंबिक कलहात वाढ का?

लॉकडाऊन काळात कौटुंबिक कलहाची झळ पुरुषांनाही बसली आहे. दीड वर्षात 1 हजार 135 पुरुषांनी पत्नी विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत. महिलांच्याही पती विरोधात दीड वर्षात जवळपास पंधराशेवरुन अधिक तक्रारी आहेत. मात्र यंदा पत्नी विरोधात तक्रारी देण्याचे प्रमाण वाढलं आहे. वर्क फ्रॉम आणि कोरोनाचं संकट असल्याने लोकं घरातच थांबत आहेत. त्याच नवरा-बायकोचे छोट्या-मोठ्या कारणांवरुन वाद होत आहेत. हे वाद विकोपाला जात आहेत. त्यामुळे कौटुंबिक कलहात वाढ झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

पोलिसांची कसरत!

आत्तापर्यंत भरोसा सेल कडून 2 हजार 394 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. बाकीच्या तक्रारींसंदर्भात पोलिस काम करत आहेत. शिवाय सामोपचाराने वाद कसे मिटतील यासाठी देखील पुणे पोलिस प्रयत्न करत आहेत.

(between corona Lockdown men in Family Dispute pune)

हे ही वाचा :

भाजप नेत्याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, क्रौर्याची परिसीमा गाठली, झाडाला लटकवलं

VIDEO : एकाच्या हातात स्टेअरिंग, दोघांचं अर्ध धड बाहेर, तिसरा थेट पुढच्या काचेला लटकलेला, तरुणांचं जीवघेणं स्टंट

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.