AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भयानक क्रूरता, अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर हत्या, प्रायवेट पार्टवर 50 वेळा चाकूने वार

कोलकाता येथे हॉस्पिटलमध्ये एका ज्यूनियर महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. आरोपीने अत्यंत निदर्यतेने हा गुन्हा केला. या घटनेबद्दल सगळ्या देशात संपात व्यक्त होत आहे. आरोपीला अत्यंत कठोरात कठोर शासन करण्याची मागणी होत आहे. त्याचवेळी आणखी एक अशीच भयानक घटना समोर आली आहे.

भयानक क्रूरता, अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर हत्या, प्रायवेट पार्टवर 50 वेळा चाकूने वार
crime
| Updated on: Aug 14, 2024 | 8:49 AM
Share

सध्या संपूर्ण देशात कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणाची चर्चा आहे. या घटनेमुळे वैद्यकीय विश्वात खळबळ उडाली आहे. आरोपीने अत्यंत क्रूरतेने ज्यूनियर महिला डॉक्टरवर अत्याचार करुन तिची हत्या केली. आरोपीला कठोरात कठोर शासन करण्याची संपूर्ण देशातून मागणी होत आहे. आता देशाच्या आणखी एका भागात अशाच प्रकारची भयानक घटना घडली आहे. एका युवतीची चाकूने भोसकून निदर्यतेने हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह निर्जन स्थळी फेकून देण्यात आला. अल्पवयीन युवतीवर बलात्कार झाल्याची सुद्धा शक्यता आहे. मृतदेह सापडला त्यावेळी अर्धनग्न अवस्थेत होता. मुलीच्या प्रायवेट पार्टवर सुद्धा जखमा आढळून आल्या आहेत. बिहारच्या मुजफ्फरपुरमध्ये हे भयानक हत्याकांड घडलं आहे.

मुलीच्या प्रायवेट पार्टवर 50 पेक्षा जास्तवेळा चाकूने वार करण्यात आल्याच्या खूणा आहेत. रविवारी रात्री युवती तिच्या घरातून गायब झाली होती. FSL च्या टीमने घटनास्थळावरुन नमुने गोळा करुन तपासणीसाठी पाठवले आहेत. ही संपूर्ण घटना लालू छपरा नयाटोला गोपाळपुरमधील आहे.

आरोपींनी हैवानियत दाखवली

मुजफ्फरपुरमध्ये आरोपींनी हैवानियत दाखवून दिली. युवतीवर बलात्कार केल्यानंतर चाकूने भोसकून तिची हत्या केली. मुलगी रविवारी रात्री घरातून गायब झाली. नातेवाईक तिचा शोध घेत होते. एका पुलाखाली तिचा मृतदेह सापडला. युवतीच्या शरीरावर 50 पेक्षा जास्तवेळा चाकूने भोसकल्याच्या जखमा आहेत. तिला अत्यंत निदर्यतेने संपवण्यात आलं. बलात्कारानंतर हत्या केल्याची शक्यता आहे.

झुडुपात रक्ताचे डाग

रात्रभर नातेवाईक मुलीचा शोध घेत होते. पण ती सापडली नाही. चारा कापणीसाठी शेतात गेल्यानंतर तिथे डोक्याचे केस आणि रक्त दिसलं. थोड पुढे गेल्यावर झुडुपात रक्ताचे डाग होते. तिथेच अर्धनग्न अवस्थेत मृतदेह दिसला. ते पाहून गावकऱ्यांची पायाखालची जमीनच सरकली. लगेच तिथे गर्दी जमा झाली. स्थानिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच एसडीपीओ कुमार चंदन पोलीस पथकासह तिथे पोहोचले. पोलिसांनी डॉग स्कवाड आणि एफएसएल टीमला तिथे बोलवून तपास सुरु केला.

गावातील स्थानिक नेत्यावरच आरोप

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी एसकेएमसीएच येथे पाठवला आहे. FSL टीमने घटनास्थळावरुन पुरावे गोळा केले आहेत. मृत मुलगी सहाभावंडांमध्ये सर्वात छोटी होती. बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी विजय कुमार यांनी गावातील स्थानिक नेत्यावरच आरोप केले आहेत.

..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ.
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल.
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?.
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर.
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक.
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?.
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान.