AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरीराचे दोन तुकडे, ब्रेस्टच कापून फेकलं! 500 लोकांकडून गुन्हा कबूल, तरीही खुनाचं रहस्य गुलदस्त्यात

1947 मध्ये लॉस एंजेलिसमध्ये हॉलिवूड अभिनेत्री एलिझाबेथ शॉर्टची निर्घृण हत्या झाली. तिचे शरीर दोन तुकड्यांत कापले गेले होते. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात तपास केला, पण खुन्याला अजूनही सापडलेला नाही. एलिझाबेथच्या आयुष्यात अनेक रहस्ये होती, आणि हा खून आजही एक गूढ प्रकरण राहिले आहे. या हत्येवर एक चित्रपटही बनला आहे.

शरीराचे दोन तुकडे, ब्रेस्टच कापून फेकलं! 500 लोकांकडून गुन्हा कबूल, तरीही खुनाचं रहस्य गुलदस्त्यात
Elizabeth Short Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 13, 2025 | 7:29 PM
Share

15 जानेवारी 1947… सकाळचे 10 वाजले असतील. लॉस एन्जलिसमध्ये राहणारी सामान्य गृहिणी बॅटी बेरसिंगर ही तिच्या मुलीसोबत फिरायला निघाली होती. रस्ता खाली होता. शुकशुकाट पसरलेला होता. नॉर्थटन एव्हेन्यूजवळून जात असताना तिची नजर गवतातील एका वस्तूकडे गेली. तिकडे पहिल्या पाहिल्या काही तरी पांढरी मॅनिक्विन तुटून पडलेली भासली. ती आणखी थोडी पुढे गेली. जरा न्याहाळून पाहिलं आणि अंगावर काटाच आला. अंग थरथरू लागलं. समोर पडलेली मॅनिक्विन नव्हती, तर मृतदेहाचे दोन तुकडे होते. शरीरावर कपड्यांचा पत्ता नव्हता. डेडबॉडी पांढरी फटक पडली होती. हे भयंकर दृश्य पाहून बॅटीने लगेचच पोलिसांना फोन केला. लॉस एन्जलिस पोलीस घटनास्थळी आले. मृतदेहाची अवस्था पाहून त्यांनाही धक्का बसला. शरीर तुटलेलं होतं. चेहरा चिरलेला होता. आतडी बाहेर काढून फेकलेली होती.

पोलिसांनी मृतदेहाला ऑटोप्सीसाठी पाठवलं. आणि ओळख पटवण्याचं काम सुरू केलं. फिंगर प्रिंट घेतल्या. रेकॉर्डमधील प्रिंटशी या फिंगर प्रिंट मिळवण्याचं काम सुरू झालं. बराच तपास केल्यावर अखेर मृतदेहाची ओळख पटली अन् तोंडचं पाणीच पळालं. हॉलिवूड अभिनेत्री एलिझाबेथ शॉर्टचा तो मृतदेह होता. हॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी जीवाचं रान करणार्या एलिझाबेथचा तो मृतदेह होता.

वाचा: जर इवांका माझी मुलगी नसती तर… ट्रम्प यांनी कहरच केला, मुलीबद्दल वादगस्त विधान

स्तन कापून फेकलं

16 जानेवारी रोजी एलिझाबेथचं ऑटोप्सी झाली. त्यात अनेक गोष्टी उघड झाल्या. एलिझाबेथचं डोकं, नखं, मनगट आणि गळ्यावर व्रण दिसून आले. उजवं स्तन कापून फेकण्यात आलं होतं. रिपोर्टनुसार, तिची हत्या केल्यानंतर खास टेक्निकद्वारे तिच्या शरीराचे दोन तुकडे करण्यात आले होते. तिला मृत्यू पूर्वी प्रचंड टॉर्चर करण्यात आलं होतं. तिच्या शरीरातील संपूर्ण रक्त वाहून गेल्यावर तिची बॉडी फेकून देण्यात आली होती. मारहाण, टॉर्चरमुळे हॅमरेज झाल्याने तिचा मृत्यू झाला. तिच्यावर बलात्कार झाल्याचा डॉक्टरला संशय होता. पण तिच्या शरीरात स्पर्म ट्रेसेस मिळाले नाही.

1000 लोकांची टीम कार्यरत

या प्रकरणात पोलिसांनी 150 लोकांची कसून चौकशी केली. जवळपास 1000 लोकांची टीम दिवस रात्र काम करत होती. तरीही आरोपी पकडला गेला नाही. जवळपास 500 लोकांनी वेगवेगळ्या वेळी एलिझाबेथची हत्या आपणच केल्याचं कबूल केलं. पण पॉलिग्राफ टेस्ट केल्यावर हे सर्वजण खोटं बोलत असल्याचं स्पष्ट झालं. एलिझाबेथचा मृत्यू झाला तेव्हा जन्मही झाला नव्हता, अशा लोकांनीही आपण तिची हत्या केल्याचं कबूल केलं होतं. केवळ एलिझाबेथमुळे मिळणाऱ्या प्रसिद्धीसाठी लोक गुन्हा कबूल करत होते, असं सांगण्यात आलं.

धंदा करण्याचा आरोप

दरम्यान, एलिझाबेथ शॉर्टवर वेश्याव्यवसाय करण्याचा आरोपही झाला होता. या प्रकरणाशी संबंधित एका डिटेक्टिव्हने यावर खुलासा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, एलिझाबेथ नेहमीच वेवगेळ्या लोकांसोबत राहत होती. त्या दरम्यान ती वेश्याव्यवसायही करायची. तिचे अनेक महिलांशीही संबंध होते, असंही काही रिपोर्टमध्ये म्हटलं गेलंय.

मग तिला कुणी मारलं?

एलिझाबेथचं आयुष्य तिच्या हत्येसारखंच गूढ होतं. तिचे असंख्य मित्र होते. नेहमीच ती नव्या मित्रांसोबत डेटवर जायची. पैशाची चणचण असतानाही तिचे सर्व कामे व्हायची. कोणी ना कोणी तिची मदत करायचा. ती कुणासोबत फिरायची? कुणासोबत राहायची? यावर तिला बोलायला कधीच आवडायचं नाही. तिच्या आयुष्यात असंख्य रहस्य होती, असंख्य वादळं होती. तिच्या जवळपासच्या लोकांनाही त्याची माहिती नव्हती.

सिनेमाही आला

या भयंकर हत्याकांडावर एक सिनेमाही येऊन गेलाय. 2006मध्ये ‘The Black Dahila’ नावाचा हा सिनेमा येऊ गेला. या हत्याकांडाला 78 वर्ष झाली आहेत. पण तरीही एफबीआयने ही केस बंद केलेली नाही. एफबीआयचे एजंट अजूनही हा गुन्हा उकलण्याचा प्रयत्न करत आहेत.

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.