AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका कॉलने बिघडवला ‘मॅडम’चा खेळ, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा धमाका, त्या घरात…

CBI Raid: 2026 च्या पहिल्याच दिवशी CBI ने भ्र्ष्टाचाराविरोधात मोठा सर्जिकल स्ट्राईक केला. आयआरएस अधिकारी प्रभा भंडारी यांना कोट्यवधींच्या लाचखोरी प्रकरणात बेड्या ठोकण्यात आल्या. एका कॉलमुळेच ती पकडली गेली. नेमकं झालं तरी काय ?

एका कॉलने बिघडवला 'मॅडम'चा खेळ, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा धमाका, त्या घरात...
कॉलने बिघडवला मॅडमचा खेळ, क्षणात अटकImage Credit source: social media
| Updated on: Jan 02, 2026 | 9:46 AM
Share

‘मॅडम पैसे मिळालेत.. ठीक आहे, ते गोल्डमध्ये बदला’ या एका संवादानेच नव्या वर्षात मोठा धमाका झाला. 60 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असलेल्या एका महिला आयआरएस अधिकाऱ्याला वर्षाच्या पहिल्याच दिवशी सीबीआयने अटक केली. झाशी रेंजच्या सीजीएसटी उपायुक्त प्रभा भंडारी यांना लाचखोरी प्रकरणात सीबीआयने अटक केली. एका रेकॉर्ड केलेल्या फोन कॉलमध्ये तिने सुप्रिटेंडेंट्सना 70 लाख रुपयांचे सोन्यात रूपांतर करण्याचे आदेश दिले होते. मात्र हा फोन कॉल ट्रेस केल्यानंतर, सीबीआयने झाशी, दिल्ली आणि ग्वाल्हेरमध्ये छापे टाकले आणि सुमारे 9 कोटी रुपयांची मोठी रोख रक्कम, सोने-चांदी आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली. या प्रकरणात दोन सुप्रिटेंडेंट, एक फर्म मालक आणि एका वकिलालाही अटक करण्यात आली आहे.

वर्षाच्या पहिल्याच दिवशी सीबीआयने केलेल्या कारवाईवरून प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. झाशी येथे तैनात असलेल्या सीजीएसटी उपायुक्त आणि आयआरएस अधिकारी प्रभा भंडारी यांना सीबीआयने 1.5 कोटी रुपयांच्या लाचखोरी प्रकरणात रंगेहाथ अटक केली आहे. ही अटक एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही, तिथे एका रेकॉर्ड केलेल्या फोन कॉलने ‘मॅडम’च्या सर्व काळ्या कृत्यांचा पर्दाफाश झाला आणि त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. याप्रकरणई अनेक जण आता गजाआड गेले आहेत.

एका कॉलने बिघडवला सगळा खेळ

या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश एका कॉल रेकॉर्डिंगमुळे झाला. सीबीआय काही काळापासून या सिंडिकेटवर लक्ष ठेवून होती. कर चुकवेगिरी प्रकरण मिटवण्यासाठी एका फर्म मालकाला 1.5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप या आरोपींवर आहे. या डीलनुसार, पहिला हप्ता 70 लाख रुपयांत देण्यात येणार होता. त्यानंतर सीबीआयने सापळा रचला.

तेव्हा एका सुप्रिटेंडंटने प्रभा भंडारी यांना फोन करून केला आणि ‘मॅडम, मिळाले सापडले आहेत.’ असं सांगितलं. मात्र त्यावर उपायुक्त प्रभा भंडारी यांची प्रतिक्रिया खूपच धक्कादायक होती. ‘ठीक आहे, ते (पैसे) आता सोन्यात बदला आणि मला द्या’ असे निर्देश त्यांनी दिले. रोख रकमेच्या तुलनेत सोन लपवणं जास्त सोपं पडेल असा त्यांचा प्लान होता, पण सीबीआय त्यांचे सर्व कॉल रेकॉर्ड करत असल्याची कल्पना त्यांना नव्हती. त्यामुळेच जेव्हा लाच म्हणून घेतलेली रक्कम सोन्यात रुपांतरित करण्याचा, बदलण्याचा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा सीबीआय अधिकाऱ्यांनी सर्वांचा मुसक्या आवळल्या.

छापेमारीत काय काय सापडलं ?

या अटकेनंतर लगेचच, सीबीआयच्या वेगवेगळ्या पथकांनी एकाच वेळी प्रभा भंडारी आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या झाशी, दिल्ली आणि ग्वाल्हेर येथील जागेवर छापे टाकले. या दरम्यान जे आढळलं त्यामुळे तपास अधिकाऱ्यांनाही आश्चर्यचा मोठा धक्का बसला. यावेळी लाखो रुपयांची रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे मोठ्या प्रमाणात दागिने अशा अनेक वस्तू सापडल्या. दिल्ली आणि इतर पॉश भागात कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. लॅपटॉप, मोबाईल फोन आणि अनेक डायरी जप्त करण्यात आल्या असून त्यामध्ये कंपन्यांकडून लाच घेतल्याचा हिशोब लिहीला असावा असा संशय आहे. सीबीआयने झांशी येथील ऑफीस आणि घरही सील केलं आहे.

या संपूर्ण खेळाची सूत्रधार प्रभा भंडारी या होत्या, पण त्यांच्या हाताखाली हे काळं साम्राज्य चालवण्यासाठी एक संपूर्ण टीम काम करत होती. या प्रकरणात सीबीआयने दोन सुप्रिटेंडेंट्सना अटक केली आहे, ते व्यापाऱ्यांशी थेट संपर्कात होते आणि पैसे वसूल करायचे. याशिवाय, लाच देणाऱ्या एका फर्म मालकाला आणि करारात मध्यस्थी करणाऱ्या वकिलालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. या सर्वांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत.

अजित पवारांकडून गुंडाना उमेदवारी, खरातांचं नाव पुढं करून दादांची पळवाट
अजित पवारांकडून गुंडाना उमेदवारी, खरातांचं नाव पुढं करून दादांची पळवाट.
उद्धव ठाकरे शिवतीर्थवर, ठाकरे बंधूंचा वचननामा फायनल? कधी होणार जाहीर?
उद्धव ठाकरे शिवतीर्थवर, ठाकरे बंधूंचा वचननामा फायनल? कधी होणार जाहीर?.
मनसेसोबत मोठा गेम? दोन उमेदवार अचानक गायब, नेमकी खेळी काय?
मनसेसोबत मोठा गेम? दोन उमेदवार अचानक गायब, नेमकी खेळी काय?.
शिवसेना उमेदवारानं खरंच प्रतिस्पर्धीचा AB फॉर्म खाल्ला?
शिवसेना उमेदवारानं खरंच प्रतिस्पर्धीचा AB फॉर्म खाल्ला?.
पुण्यात भाजप उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या अन
पुण्यात भाजप उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या अन.
एका उमेदवारानं दुसऱ्या उमेदवाराचा AB फॉर्म खाल्ला, पुण्यात एकच चर्चा
एका उमेदवारानं दुसऱ्या उमेदवाराचा AB फॉर्म खाल्ला, पुण्यात एकच चर्चा.
जेजुरी येथे भंडारा उधळत नववर्षाचे स्वागत, भाविकांकडून खंडोबाचे दर्शन
जेजुरी येथे भंडारा उधळत नववर्षाचे स्वागत, भाविकांकडून खंडोबाचे दर्शन.
मनसेचे 53 उमेदवार थेट राज ठाकरेंच्या भेटीला, पडद्यामागे घडतंय काय?
मनसेचे 53 उमेदवार थेट राज ठाकरेंच्या भेटीला, पडद्यामागे घडतंय काय?.
शिंदे सेनेला निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का, 'स्थानिक' निवडणुकीत आव्हान
शिंदे सेनेला निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का, 'स्थानिक' निवडणुकीत आव्हान.
तितकी मिर्ची बुरखेवाली महापौर बनेल याची का लागली नाही, राणेंचा प्रहार
तितकी मिर्ची बुरखेवाली महापौर बनेल याची का लागली नाही, राणेंचा प्रहार.