तुमच्याकडील नोटा बनावट नाहीत ना? घरात नोटांचा छापखाना, मुंबईत 35 वर्षीय तरुणाला अटक

मुंबईतील आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट नोटा छापणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या (Chembur Man Fake Currency YouTube)

तुमच्याकडील नोटा बनावट नाहीत ना? घरात नोटांचा छापखाना, मुंबईत 35 वर्षीय तरुणाला अटक
आरोपी फकीयान आयुब खान
अनिश बेंद्रे

|

Feb 19, 2021 | 11:46 AM

मुंबई : बनावट नोटा छापणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने चेंबुर परिसरातून अटक केली आहे. कर्ज फेडण्यासाठी त्याने बनावट नोटा छापण्याचे काम सुरु केले होते. आरोपी फकीयानने यूट्यूबवरुन नोटा छापण्याचे प्रशिक्षण घेतले होते. (Chembur Man learns to print Fake Currency on YouTube)

मुंबईतील आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट नोटा छापणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. फकीयान आयुब खान असे 35 वर्षीय तरुणाचे नाव आहे. आरोपी तरुण कर्जबाजारी झाला होता. कर्ज फेडण्यासाठी त्याने बनावट नोटा छापण्याचे काम सुरू केले होते.

मुंबई पोलिसांना सापळा रचला

मुंबई पोलिसांना माहिती मिळाली होती की एक युवक चेंबुर भागात बाजारात बनावट नोटा वाटण्यासाठी येणार आहे. बातमी मिळताच गुन्हे शाखेच्या युनिट 4 ने सापळा रचत फकीयानला हटकले. त्याच्या अंग झडतीत बनावट नोटा सापडून आल्या.

यूट्यूब व्हिडीओ पाहून बनावट नोटांची छपाई

अधिक तपास करता त्याच्या घरातून प्रिंटर शाई आणि नोटा छापण्यासाठी लागणारा कागद हस्तगत करण्यात आला. तो 500, 200, 50 रुपयांच्या नोटा छापत असे. फकीयानने यूट्यूबवरुन नोटा छापण्याचे प्रशिक्षण घेतले होते. मात्र यामागे आणखी कोण कोण आहे आणि त्याने आतापर्यंत किती नोटा बाजारात आणल्या आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत. फकीयानला अटक करुन पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

संबंधित बातम्या :

अ‌ॅमेझॉन वरुन मागवले कलर प्रिंटर, घरातच बनवत होता बनावट नोटा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

धुळे पोलिसांची मोठी कारवाई, बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पुण्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा भांडाफोड, 47 कोटी 60 लाखांच्या बनावट नोटा जप्त

(Chembur Man learns to print Fake Currency on YouTube)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें