AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, ऑपरेशन सिंदूरची रांगोळी, कौतुक सोडा, पोलिसांनी थेट 27 कार्यकर्त्यांवर केस ठोकली

Chhatrapati Shivaji Maharaj banner : FIR नुसार, मंदिराजवळ 50 फुटावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक फ्लेक्स बोर्ड लावण्यात आला होता. हे कृत्य प्रतिस्पर्धी राजकीय गटाला डिवचण्यासाठी आणि दंगा भडवण्यासाठी असल्याचे म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, ऑपरेशन सिंदूरची रांगोळी, कौतुक सोडा, पोलिसांनी थेट 27 कार्यकर्त्यांवर केस ठोकली
ऑपरेशन सिंदूर
| Updated on: Sep 07, 2025 | 9:15 AM
Share

Operation Sindoor : केरळमध्ये कोल्लम जिल्ह्यातील पोलिसांच्या कारवाईवर संताप व्यक्त करण्यात येत आहे. एका मंदिरात पुकलम म्हणजे रांगोळी काढणाऱ्या 27 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यावरून वातावरण तापलं आहे. ऑपरेशन सिंदूरवर ही रांगोळी काढण्यात आली होती. तर FIR नुसार, मंदिराजवळ 50 फुटावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक फ्लेक्स बोर्ड लावण्यात आला होता. हे कृत्य प्रतिस्पर्धी राजकीय गटाला डिवचण्यासाठी आणि दंगा भडवण्यासाठी असल्याचे म्हटले आहे.

मंदिर प्रशासनाच्या दावा आहे की मंदिर परिसरात रांगोळी काढणे हे हायकोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन आहे. ही घटना जिल्ह्यातील मुथुपिलक्क येथील पार्थसारथी मंदिरातील आहे. मंदिर समितीचे सदस्य मोहनन यांच्यानुसार, रांगोळीत ऑपरेशन सिंदूर लिहिले आहे तर आरएसएसचा एक ध्वज रेखाटण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात रांगोळीतून असा ध्वज रेखाटण्यावरून यापूर्वी सुद्धा वाद आणि धक्काबुक्की झाली असल्याचे मंदिर समितीच्या सदस्याचे म्हणणे आहे.

मंदिर समितीची भूमिका काय?

मंदिर समितीच्या एका पदाधिकाऱ्याने या वादावर प्रकाश टाकला. त्यानुसार सततच्या वादाला कंटाळून समितीने हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने 2023 मध्ये मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारचा ध्वज आणि सजावटीला मनाई केली आहे. तरीही RSS च्या स्वयंसेवकांनी मंदिर परिसरात फुलांची आरस केली. त्याला लागूनच हिंदू ध्वज रेखाटला. फुलांची एक रांगोळी काढली. त्याखाली ऑपरेशन सिंदूर असे लिहिले. हा सर्व प्रकार हायकोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन आहे. यामुळे दोन समाजात वाद उफाळू शकतो. त्यामुळे आम्ही पोलिसांकडे तक्रार दाखल केली. आम्ही ऑपरेशन सिंदूरचा आदर करतो. पण स्वयंसेवक दंगा व्हावा, वाद उफळावा यासाठी असा प्रकार घडवून आणत असल्याचे मंदिर समिती सदस्यांचे म्हणणे आहे. मंदिर समिती सदस्य अशोकन सी यांच्या तक्रारीनंतर केरळ पोलिसांनी 27 स्वयंसेवकांविरोधात गुन्हा दाखल केला.

भाजपचा तिखट प्रहार

भाजपने या सर्व प्रकरणाचा निषेध केला. कोल्लम जिल्ह्यात 27 स्वयंसेवकांवर पोलिसांनी केलेली कारवाई अन्यायकारक आणि धक्कादायक असल्याचे भाजपने म्हटले आहे. केरळमध्ये जमात-ए-इस्लामीचे सरकार आहे की पाकिस्तानचे असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी विचारला आहे. भाजप या कारवाईला हायकोर्टात आव्हान देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ऑपरेशन सिंदूर लिहिणे, पुक्कलम, रांगोळी काढणे आणि आमचे स्वाभिमानाचे प्रतिक छत्रपती शिवाजी महाराज यांचा फ्लेक्स लावणे कधीपासून या देशात गुन्हा ठरत आहे, असा सवाल करत त्यांनी केरळ सरकारवर निशाणा साधला.

सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.