चोरट्यासोबतच्या झटापटीत लोकलखाली आलेल्या महिलेच्या मृत्यूने तीन मुली झाल्या पोरक्या; ह्रदय पिळवटून टाकणारी कहाणी

चोरट्यासोबतच्या झटापटीत लोकलखाली आलेल्या महिलेच्या मृत्यूने तीन मुली झाल्या पोरक्या; ह्रदय पिळवटून टाकणारी कहाणी
विद्या पाटील

ठाणे लोहमार्ग पोलिसांनी चोरट्याला जेरबंद केल्यानंतर ही ह्रदय पिळवटून टाकणारी कहाणी समोर आली आहे. विद्या हिच्या मृत्यूने पाटील कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Death of a woman who fell under a local in a fight with a thief)

वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jun 01, 2021 | 7:33 PM

ठाणे : मध्य रेल्वेवरील कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान मोबाईल चोरट्यासोबतच्याा झटापटीत लोकलखाली आलेल्या महिलेच्या मृत्यूने तिच्या तीन लहान मुली पोरक्या झाल्या आहेत. विद्या पाटील ही 35 वर्षीय विवाहिता मुलींच्या शिक्षणासाठीच काम करीत होती. कोरोना महामारीत हातची नोकरी गेली तर मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होईल, या चिंतेने ती लॉकडाऊन काळातही नोकरीवर जात होती. चोरट्यासोबतच्या झटापटीदरम्यान काळाने तिच्यावर घाला घातला व मुलींचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिची सुरू राहिलेली अविरत तळमळ थांबली. ठाणे लोहमार्ग पोलिसांनी चोरट्याला जेरबंद केल्यानंतर ही ह्रदय पिळवटून टाकणारी कहाणी समोर आली आहे. विद्या हिच्या मृत्यूने पाटील कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Death of a woman who fell under a local in a fight with a thief)

मुलींच्या शिक्षणाबरोबर संसारात पतीला हातभार

विद्या पाटील ही अंधेरीतील साकीनाका येथे कामाला होती. घरी परतण्यासाठी तिने ठाण्याहून लोकल पकडली होती. गाडी फलाटावर आल्यावर चोरट्याने तिचा मोबाईल हिसकावला आणि तो विरुद्ध दिशेने पळत होता. त्याचा पाठलाग करताना ती लोकलखाली आली व त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. विद्याचे पती ज्ञानेश्वर इलेक्ट्रीशियनचे काम करतात. विद्याला पूर्वा (9), मेधा (6) आणि आठ महिन्याची परी या तीन मुली आहे. मुलींना चांगले शिक्षण देऊन मोठे करण्याचा तिचा मानस होता. त्यासाठी ती काम करुन मुलींसह पतीच्या संसाराला  हातभार लावत होती. तिच्या अपघाती मृत्यूमुळे तिन्ही मुली पोरक्या झाल्या आहे. ती कामाला जात असताना तिच्या आठ महिन्याच्या परीचा सांभाळ तिचे सासू सासरे करीत होते. लॉकडाऊनमध्येही ती नोकरी संभाळून होती. राज्यातील कठोर निर्बंधांमुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांनाच लोकलने प्रवास करण्यास मुभा आहे. अशातच चोरट्याने लोकलमध्ये शिरुन महिलेचा जीव घेतल्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सराईत गुन्हेगार फैजल शेख पोलिसांच्या ताब्यात

मोबाईलची चोरी करण्यासाठी विद्या पाटील यांच्यासोबत झटापट करणारा 31 वर्षीय फैजल शेख याला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात यापूवीर्ही चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करीत आहेत. (Death of a woman who fell under a local in a fight with a thief)

इतर बातम्या

भ्रष्ट कारभारावर नाराजी व्यक्त करीत इसमाचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी घेतले ताब्यात

ट्रॅक्टरची मागची चाकं मोठी, मग पुढची चाकं लहान का? जाणून घ्या यामागचं नेमकं कारण

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें