घरजावई असल्यावरुन टोमण्यांचा कंटाळा, 21 वर्षीय पत्नीसह सासूची गोळ्या झाडून हत्या

टोमण्यांना कंटाळून जावयाने आपल्या सासू आणि पत्नीला गोळ्या झाडून ठार मारल्याचा आरोप केला जात आहे. दोघींचाही राहत्या घरातच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर आरोपीने स्वतः पोलिसांना फोन करून या प्रकरणाची माहिती दिली.

घरजावई असल्यावरुन टोमण्यांचा कंटाळा, 21 वर्षीय पत्नीसह सासूची गोळ्या झाडून हत्या
पतीचे दुसर्‍या महिलेशी प्रेमसंबंध, पत्नीला राग अनावर; आधी गोळी मारली मग शरीराचे केले तुकडे

नवी दिल्‍ली : देशाची राजधानी दिल्लीमध्ये तरुणाने पत्नी आणि सासूची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. गोळी झाडून पत्नी आणि सासूचा खून केल्यानंतर आरोपीने स्वतःच दिल्ली पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्याला अटक केली आणि प्रकरणाचा तपास सुरु केला.

काय आहे प्रकरण?

ही घटना दिल्लीच्या बाबा हरिदास नगर परिसरातील आहे. टोमण्यांना कंटाळून जावयाने आपल्या सासू आणि पत्नीला गोळ्या झाडून ठार मारल्याचा आरोप केला जात आहे. दोघींचाही राहत्या घरातच मृत्यू झाला. आरोपीचे नाव महेश असून तो बाबा हरिदास नगरमधील नर्नम पार्क येथे सासूच्या घरी राहतो. आरोपीच्या मृत पत्नीचे नाव निधी (वय 21 वर्षे) आणि सासूचे नाव वीरो (वय 55 वर्षे) होते.

नेमकं काय घडलं?

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेशचा त्याच्या सासू आणि पत्नीवर राग होता, कारण तो घरजावई असल्यावरुन दोघी अनेकदा त्याला टोमणे मारत असत. या कारणास्तव त्याने पत्नी आणि सासूची गोळ्या घालून हत्या केली. एवढेच नाही तर ही घटना घडल्यानंतर महेशने स्वतः पोलिसांना फोन करून या प्रकरणाची माहिती दिली.

आरोपीला घटनास्थळावरुन अटक

अटकेच्या भीतीने पळून जाण्याऐवजी तो घटनास्थळीच थांबला होता. पोलिसांनी त्याला तिथूनच अटक केली. पोलिसांनी सांगितले की त्याच्या ताब्यातून हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त करण्यात आले आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) अंतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह, तरुण घरजावई

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश कार खरेदी आणि विक्रीचे काम करतो. त्याने आणि निधीने तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता, पण घर जावई असल्यावरुन रोजचे टोमणे ऐकून त्याने पत्नी आणि सासूला गोळ्या घालून ठार मारले. सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन दुहेरी हत्याकांडाचा तपास सुरू केला आहे.

संबंधित बातम्या :

55 वर्षीय महिलेवर चौघा जणांचा सामूहिक बलात्कार, जंगलात गाठून दुष्कृत्य

प्रेयसीच्या कमी उंचीवरुन गावकऱ्यांचे टोमणे, प्रियकराकडून कुऱ्हाडीने गळा चिरुन हत्या

वाईन शॉपीवर दारु खरेदी करताना चाकूहल्ला, औरंगाबादमध्ये तरुणाचा मृत्यू

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI