बाथरूममध्ये हिडन कॅमेरा लावून मुलींना लाइव्ह पाहायचा, आणि एके दिवशी… पायाखालची वाळू सरकवणारी घटना काय?
एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. घरमालकाचा मुलगा महिला भाडेकरूच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये स्पाय कॅमेरे लावून व्हिडिओ बनवत असे.

दिल्लीमधील शकरपूर येथे एका 30 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याने कथितरित्या एका महिला भाडेकरूच्या बाथरूम आणि बेडरूममधील बल्ब होल्डरमध्ये हिडन कॅमेरे लावून तिचे अश्लील व्हिडिओ बनवले. सिव्हिल सेवा प्रवेश परीक्षेची तयारी करणारी ही महिला शकरपूर येथे भाड्याच्या घरात एकटी राहत होती. आरोपी करण हा घर मालकाचा मुलगा असून तो त्याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहतो. महिलेने सांगितले की, जेव्हा ती उत्तर प्रदेशातील आपल्या घरी गेली होती, तेव्हा तिने आपल्या फ्लॅटच्या चाव्या करणकडे सोपवल्या होत्या.
महिलेला असा झाला संशय
वरिष्ठ पोलीस अधिकारी अपूर्व गुप्ता यांच्या मते, महिलेने तक्रारीत सांगितले की, तिला अलीकडे तिच्या व्हॉट्सअॅप खात्यावर काही असामान्य हालचाली दिसल्या. तिने तिच्या व्हॉट्सअॅप खात्याशी जोडलेल्या डिव्हाइसेसची तपासणी केली असता तिला एक अनोळखी लॅपटॉप आढळला. त्यानंतर तिने तात्काळ व्हॉट्सअॅपमधून लॉग आउट केले. यामुळे ती सतर्क झाली आणि तिला आपली जासूसी होत असल्याचा संशय आला. महिलेने आपल्या फ्लॅटची झडती घेण्यास सुरुवात केली आणि तिला बाथरूमच्या बल्ब होल्डरमध्ये एक कॅमेरा लावलेला आढळला. तिने तात्काळ पोलिसांना संपर्क केला.
वाचा: ‘या’ झाडाला चिटकूनच बसतात विषारी साप, काय असतं कारण?
बेडरूम आणि बाथरूममध्ये लावले गुप्त कॅमेरे
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, एक उपनिरीक्षक महिलेच्या घरी पोहोचला आणि तपासणीदरम्यान बेडरूमच्या बल्ब होल्डरमध्ये आणखी एक कॅमेरा आढळला. जेव्हा तिला विचारण्यात आले की तिच्या खोलीत आणखी कोणी येत होते का, तेव्हा महिलेने पोलिसांना सांगितले की, जेव्हा ती बाहेरगावी जाते तेव्हा ती सहसा घर मालकाच्या मुलाला करणकडे चाव्या सोपवत असे.
करणने दिली कबुली
चौकशीदरम्यान, करणने पोलिसांना सांगितले की, तीन महिन्यांपूर्वी जेव्हा महिला आपल्या घरी गेली होती, तेव्हा तिने चाव्या त्याच्याकडे सोपवल्या होत्या. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, “याच दरम्यान करणने तीन हिडन कॅमेरे विकत घेतले आणि त्यापैकी एक महिलेच्या बेडरूममध्ये आणि एक बाथरूममध्ये लावला.”
पोलिसांनी असा लावला शोध
हे कॅमेरे ऑनलाइन वापरता येत नसून त्यांचे फुटेज मेमरी कार्डवर साठवले जात होते. त्यामुळे करण वारंवार वीज दुरुस्तीच्या बहाण्याने महिलेकडून चाव्या मागत असे, जेणेकरून तो रेकॉर्ड केलेले व्हिडिओ आपल्या लॅपटॉपवर हस्तांतरित करू शकेल. तपासादरम्यान पोलिसांनी करणकडून एक हिडन कॅमेरा आणि रेकॉर्डिंग्ज साठवण्यासाठी वापरलेले दोन लॅपटॉप जप्त केले. 30 वर्षीय आरोपी करण हा अपंग आहे आणि सध्या त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. या कायद्यांतर्गत त्याला किमान एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. पोलिसांनी पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.