Ichalkaranji Murder : इचलकरंजीमध्ये वृद्ध महिलेची हत्या, वृद्धाला खोलीत कोंडले; दागिने घेऊन चोरटा पसार

साडे नऊच्या सुमारास एका चोरट्याने घरात प्रवेश केला आणि वृद्ध चंपाबाई यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले. त्यानंतर वृद्ध चंपाबाई यांना स्वयंपाक घरात मारून टाकले.

Ichalkaranji Murder : इचलकरंजीमध्ये वृद्ध महिलेची हत्या, वृद्धाला खोलीत कोंडले; दागिने घेऊन चोरटा पसार
अनैतिक संबंधाच्या संशयातून हरियाणात दुहेरी हत्या
Image Credit source: tv9
साईनाथ जाधव

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jul 31, 2022 | 11:54 PM

इचलकरंजी : दागिन्यांसाठी अज्ञात चोरट्याने एका वृद्ध महिलेची हत्या (Murder) केल्याची घटना शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शिरोळ तालुक्यातील चिंचवाड येथील नंदीवाले वसाहतीमध्ये उघडकीस आली आहे. महिलेच्या अंगावरील दागिने (Jewelery) चोरट्याने खेचून नेले. यावेळी मध्ये आलेल्या वृ्द्ध पती (Husband)ला चोरट्यने बाहेरच्या खोलीत कोंडून ठेवले आणि चोरटा पसार झाला. चंपाबाई भूपाल ककडे (75) असे हत्या करण्यात आलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. तर भूपाल ककडे (80) असे कोंडून ठेवण्यात आलेल्या वृद्धाचे नाव आहे. दोघेही शेतातील घरात एकटे राहतात. या हत्येमुळे चिंचवाड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वृद्ध पती-पत्नी घरात एकटेच राहत होते

गेल्या अनेक वर्षांपासून भूपाल ककडे यांचा मुलगा हुपरी येथे राहत असल्याने वृद्ध पती पत्नी चिंचवाड येथील नंदीवाले वसाहत परिसरात असलेल्या शेतात राहत आहेत. भूपाल ककडे हे आजारी आहेत. त्यामुळे पती पत्नी घरात होते. साडे नऊच्या सुमारास एका चोरट्याने घरात प्रवेश केला आणि वृद्ध चंपाबाई यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले. त्यानंतर वृद्ध चंपाबाई यांना स्वयंपाक घरात मारून टाकले. यावेळी पत्नीचा आवाज ऐकून वृद्ध भूपाल ककडे तेथे आले. ककडे आणि चोरामध्ये झटापट झाली. चोरांनी वृद्ध भूपाल यांना बाहेरील खोलीत कोंडून ठेवले आणि दाराला कडी घालून मागील दाराने पलायन केले.

वृद्धाचा आरडाओरडा ऐकून नागरिक धावत आले

वृद्ध भूपाल यांनी आरडाओरड केली. त्यानंतर परिसरात असलेल्या नागरिकांनी धाव घेतली. दाराची कडी काढून पाहिले असता आत वृद्ध भूपाल ककडे यांना कोंडल्याचे लक्षात आले. तर स्वयंपाक घरात चंपाबाई यांचा मृतदेह दिसला. त्यानंतर वृद्ध भूपाल यांनी घडलेल्या घटनेची माहिती नागरिकांना दिली. त्यानंतर नागरिकांनी सदर घटनेची माहिती शिरोळ पोलिसांना दिली. शिरोळ पोलीस व डीवायएसपी रामेश्वर वैजने, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे, राजेंद्र मस्के यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शिरोळ ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. तर रात्री उशिरा ठसे, श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. (Elderly woman killed by thief after stealing jewelery in Ichalkaranji)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें