AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गडचिरोलीत 22 लाखांचे बक्षीस असलेल्या चार जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

शासनाकडून 22 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर असलेल्‍या चार जहाल (Four Naxalites surrender In Gadchiroli) नक्षलवाद्यांनी मंगळवारी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

गडचिरोलीत 22 लाखांचे बक्षीस असलेल्या चार जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Mar 23, 2021 | 4:15 PM
Share

गडचिरोली : शासनाकडून 22 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर असलेल्‍या चार जहाल (Four Naxalites surrender In Gadchiroli) नक्षलवाद्यांनी मंगळवारी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यामध्ये 3 पुरुष आणि 1 महिला नक्षलीचा समावेश आहे. आत्मसमर्पण केलेल्या चारही नक्षलवाद्यांवर खून, जाळपोळ, चकमकी असे विविध गुन्हे दाखल होते, अशी माहिती गडचिरोलीच्या जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली (Four Naxalites surrender In Gadchiroli On Whom Reward Of Rs 22 Lakh On Naxalites).

1) दिनेश उर्फ दयाराम गंगर नैताम हा 28 वर्ष वयाचा जहाल माओवादी डिसेंबर 2006 मध्ये टिपागड दलमच्या सदस्य पदावर भरती होवुन फेब्रुवारी 2007 पासून टिपागड तसेच चातगाव दलममध्ये कार्यरत होता. मार्च 2007 च्या शेवटी प्लाटून क्रमांक 03 मधुन बदली होवुन भामरागड दलममध्ये कार्यरत होता. 2010 ला एसीएम पदावर भामरागड दलममध्ये पदोन्नती झाली. सप्टेंबर 2021 ला दलम कमांडर म्हणुन पदोन्नती दिली आणि डिसेंबर 2018 पर्यंत कमांडर पदावर कार्यरत होता. फरवरी 2019 ला प्लाटुन क्रमांक 07 चे गठण करुन प्लाटुन क्रमांक 07 चे कमांडर बनला. आक्टोबर 2020 पर्यंत भामरागड एरिया कमांडर पदावर कार्यरत होता. त्याच्यावर चकमकीचे 11 गुन्हे , खुनाचे 6 गुन्हे, जाळपोळीचे 3 गुन्हे दाखल असुन शासनाने त्याच्यावर एकूण 08 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

2) नकुल उर्फ सुखालुराम डुमा मडावी हा 35 वर्ष वयाचा माओवादी सप्टेंबर 2002 मध्ये टिपागड दलम मध्ये सदस्य म्हणून भरती होवुन नोव्हेंबर 2003 मध्ये टिपागड दलममधुन बदलून प्लाटुन क्र. -03 मध्ये कार्यरत होता. सन 2006 मध्ये प्लाटुन क्र. 03 चा सेक्शन क.01 चा उपकमांडर तर सन 2008 मध्ये प्लाटुन क्र. 03 चा सेक्शन कमांडर म्हणुन कार्यरत होता. एप्रिल 2007 मध्ये नक्षल सदस्या निला कुमरे हिचेसोबत लग्न केले. त्याचेवर चकमकीचे 09 गुन्हे, 04 खुनाचे, जाळपोळीचे 05 गुन्हे, 01 भूसुरुंग स्फोटाचे गुन्हे दाखल असुन शासनाने आठ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

3) निला रुषी कुमरे ही 34 वर्ष वयाचा माओवादी असुन ती नोव्हेंबर 2005 ला कसनसूर दलम मध्ये सीएनएमएम टिममध्ये सदस्या पदावर भरती होवुन सन 2007 मध्ये नकुल उर्फ सुखालुराम डुमा मडावी प्लाटुन क्र.03 सेक्शन क्र. 01 चा कमांडर याचेसोबत लग्न केले. ते दोघेही कसनसूर दलममध्ये कार्यरत होते. तिचेवर चकमकीचे 3 गुन्हे, 3 खुनाचे, जाळपोळीचे 4 गुन्हे दाखल असुन, तिच्यावर शासनाने 2 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

4) शरद उर्फ रमेश उर्फ गोविंदा सामजी आतला हा 26 वर्ष वयाचा माओवादी जानेवारी 2011 ला चातगाव दलम मध्ये सदस्य म्हणून भरती होवुन माहे सप्टेंबर 2019 ला पीपीसीएम पदावर पदोन्नती होवून माहे नोव्हेंबर 2020 पर्यंत झोन टिडीला पीपीसीएम पदावर आजपावेतो कार्यरत. त्याचेवर चकमकीचे 6 गुन्हे, 2 खुनाचे गुन्हे दाखल असुन, त्याच्यावर शासनाने चार लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवाद्यांचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळुन वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवुन आणल्यामुळे माओवादी मोठया संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे सन 2020-21 या वर्षांत आजपर्यंत 37 माओवादयांनी आत्मसमर्पण केले आहे. यात 4 डिव्हीसी, 2 दलम कमांडर, 2 दलम उपकमांडर, 28 सदस्य, 1 जनमिलीशिया यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी दिली.

Four Naxalites surrender In Gadchiroli On Whom Reward Of Rs 22 Lakh On Naxalites

संबंधित बातम्या : 

मला नक्षलवादी व्हायचंय, हवालदिल शेतकऱ्याचं हिंगोली तहसीलदाराकडे निवेदन

नक्षलवादी भागात जेव्हा जवान नृत्य करतात, पाहा व्हिडीओ, अभिमान वाटेल!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.