पुण्याच्या तरुणाचे गुजरातमधील महिलेशी सूत जुळले, पण मुलाच्या घरच्यांनी दुसरीकडे लग्न ठरवले, मग तरुणीने थेट…

प्रेमासाठी वाट्टेल ते म्हणत प्रेयसीने जे केले ते उघड होताच पोलीसही चक्रावले. यानंतर प्रेयसीची थेट तुरुंगात रवानगी केली.

पुण्याच्या तरुणाचे गुजरातमधील महिलेशी सूत जुळले, पण मुलाच्या घरच्यांनी दुसरीकडे लग्न ठरवले, मग तरुणीने थेट...
प्रेयसीकडून प्रियकराचे अपहरणImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 2:53 PM

पुणे : प्रेमासाठी व्यक्ती वाट्टेल ते करायला तयार असतो. मग तो वाट्टेल तो मार्ग गुन्हेगारीचा असला तरी मागे हटत नाहीत. अशीच एक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. आपले प्रेम मिळवण्यासाठी प्रेयसीने जे केले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. प्रेयसीने चक्क प्रियकराचं अपहरण करुन त्याला डांबून ठेवलं. तरुणाच्या अपहरणानंतर हे प्रकरण पोलिसात गेलं. पोलिसांनी तपासाची सूत्रं हलवत महिलेसह दोन आरोपींना अटक केली आणि तरुणाची सुटका केली. प्रथमेश राजेंद्र यादव आणि अक्षय मारुती कोळी अशी अटक आरोपींची नावे आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

पुण्यातील 28 वर्षीय तरुण गुजरातमधील वापी येथे एका खासगी कंपनीत नोकरीला होता. तेथे त्याच्यासोबत कंपनीत काम करणाऱ्या एका विवाहित महिलेशी त्याचे प्रेमसंबंध जुळले. मात्र तरुणाच्या घरच्यांनी त्याचे दुसऱ्या मुलीशी लग्न ठरवले. यासाठी तो पुण्यात परतला होता. ही बाब तरुणाच्या प्रेयसीला कळल्यानंतर तिचा संताप झाला. महिलेने तरुणाच्या अपहरणाचा कट रचत यासाठी दोघांना सुपारी दिली.

सीसीटीव्हीमुळे लागला अपहरणाचा छडा

आरोपींनी एनडीए रोडवरील कोंढवे धावडे परिसरातून तरुणाचे अपहरण केले. यानंतर त्याला वापी येथे एका हॉटेलात कोंडून ठेवण्यात आले होते. तरुणाच्या अपहरणानंतर त्याच्या भावाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीतीलअपहरणात वापरलेल्या कारची माहिती घेतली असता, ही कार गुजरातमधील असल्याचे निष्पन्न झाले.

हे सुद्धा वाचा

यानंतर पोलीस कारची सर्व माहिती गोळा करत आरोपींपर्यंत पोहचले. पोलिसांनी हॉटेलमधून तरुणाची सुटका करत महिलेला ताब्यात घेतले. अपहरण करणारे महिलेचे दोन साथीदार मूळचे सातारा जिल्ह्यातील असून, त्यांना पुसेगाव येथून अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.

जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई.
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका.
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल.
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त.
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.