भावा-बहिणीच्या नात्याला काळीमा, 12 वर्षांची सख्खी बहीण गरोदर, भावावर बलात्काराचा आरोप

हरियाणाच्या जींद जिल्ह्यात एक विचित्रप्रकार समोर आलाय (Haryana 12 year old girl pregnant)

भावा-बहिणीच्या नात्याला काळीमा, 12 वर्षांची सख्खी बहीण गरोदर, भावावर बलात्काराचा आरोप

चंदीगड : हरियाणाच्या जींद जिल्ह्यात एक विचित्रप्रकार समोर आलाय. सख्या भावाने लैंगिक अत्याचार केल्याने एक बारा वर्षांची अल्पवयीन मुलगी गरोदर राहीली आहे. मुलीच्या वैद्यकीय तपासणीनंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. मुलीने याप्रकरणी आपल्या 14 वर्षीय मोठ्या भावावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. मुलीच्या आईने याप्रकरणी आरोपी भावाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे (Haryana 12 year old girl pregnant).

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचं वय हे अवघं साडे बारा वर्ष इतकं आहे. पीडित मुलगी जवळपास साडेसात महिन्यांची गर्भवती आहे. पीडितेचं गेल्या दोन-तीन दिवसांपासून प्रचंड पोटात दुखत होतं. याशिवाय तिच्या पोटाचा आकारही वाढला होता. मुलीला जेव्हा रुग्णालयात नेलं तेव्हा ती सात महिन्यांची गर्भवती आहे, असं समजलं, अशी माहिती पीडितेच्या आईने पोलिसांना सांगितली.

पोलिसांचा तपास सुरु

पीडित मुलीची चौकशी केली तेव्हा आपल्या 14 वर्षांच्या मोठ्या भावाने गेल्यावर्षी लैंगिक शोषण केल्याचं मुलीनं कबुल केलं. घरात कुणी नसताना मोठा भाऊ वारंवार तशाप्रकारचं कृत्य करायचा, असं पीडितेच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान, या प्रकरणाचा सध्या तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली (Haryana 12 year old girl pregnant).

संबंधित बातमी : मुंबईत 30 ते 40 कुत्र्यांवर बलात्कार, निर्लज्ज आरोपी म्हणतो प्राण्यांना आक्षेप नाही, तर गुन्हा कसा?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI