अचानक असे काय घडले की सुरु होण्याआधीच नवविवाहित जोडप्याचा संसार तुटला

मेक्सिकोमध्ये टोळीयुद्ध आणि अंमली पदार्थांमुळे घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना सामान्य मानल्या जातात. अनेक वेळा सर्वसामान्यांनाही यात जीव गमवण्याची वेळ येते.

अचानक असे काय घडले की सुरु होण्याआधीच नवविवाहित जोडप्याचा संसार तुटला
विवाह संपन्न होताच नवरदेवाची हत्याImage Credit source: social
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 4:46 PM

मेक्सिको : प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यात लग्नाचा दिवस हा खूप खास असतो. या दिवसासाठी प्रत्येक जोडपे महिनोंमहिने तयारी करत असतात. खूप स्वप्न या दिवसासाठी सजवलेली असतात. विवाह सोहळा (Wedding Ceremony) व्यवस्थित संपन्न व्हावा आणि कोणते विघ्न येऊ नये, यासाठी दोन्हीकडची मंडळी पुरेपूर काळजी घेतात. मात्र मेक्सिकोमध्ये (Mexico) विवाहाच्या दिवशीच नवरदेवासोबत अशी घटना घडली की, आनंदी कुटुंबावर शोककळा पसरली. विवाह संपन्न झाल्यानंतर नवविवाहित जोडपे चर्चच्या बाहेर येताच अज्ञात हल्लेखोराने नवरदेवाची हत्या (Murder of Groom) केली.

मार्को अँटोनियो असे हत्या करण्यात आलेल्या नवरदेवाचे नाव आहे. मार्को पेशाने आयटी इंजिनिअर आहे. मेक्सिकोच्या कार्बोका शहरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. या हत्याकांडाने एकच खळबळ माजली आहे.

नववधूसोबत कारच्या दिशेन जात असतानाच हल्ला

मेक्सिकोमध्ये टोळीयुद्ध आणि अंमली पदार्थांमुळे घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना सामान्य मानल्या जातात. अनेक वेळा सर्वसामान्यांनाही यात जीव गमवण्याची वेळ येते.

हे सुद्धा वाचा

अशाच प्रकारच्या घटनेतून मार्कोची हत्या झाली आहे. मार्कोचा विवाह 23 ऑक्टोबर रोजी कार्बोका शहरातील एका चर्चमध्ये संपन्न झाला. विवाहानंतर जोडपे चर्चबाहेर आले आणि आपल्या कारच्या दिशेने जात होते.

अज्ञात बंदुकधाऱ्याकडून मार्कोवर गोळीबार

याच दरम्यान एक अज्ञात बंदुकधारी आला आणि त्याने मार्कोवर लक्ष केंद्रित करत गोळीबार सुरु केला. यानंतर पॅरामेडिक्सला तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले, मात्र सर्व प्रयत्न करूनही मार्कोचे प्राण वाचू शकले नाही.

असे म्हटले जात आहे की, मार्कोची हत्या चुकून झाली आहे. हल्लेखोराला दुसऱ्याच कोणाला मारायचे होते. मात्र तो व्यक्ती समजून त्याने मार्कोला मारले. त्याच दिवशी त्या चर्चबाहेर एका व्यक्तीची हत्या झाली होती.

या घटनेमुळे एक संसार सुरु होण्याआधीच मोडला आहे. ज्या जोडीदारासोबत आयुष्यभराची स्वप्नं रंगवली होती, त्याच वधूच्या मांडीवर मार्कोने अखेरचा श्वास घेतला.

जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'.
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द.
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन.
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?.
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी...
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी....
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या....
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर.
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?.
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....