AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी विवाहित महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट यायची, त्यानंतर जे घडायचं त्याने… तो त्या महिलांनाच का टार्गेट करायचा?

सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये आजकाल लक्षणीय वाढ झाली आहे. दररोज फसवणुकीच्या विविध घटनांची समोर येत असतात. स्कॅमर सोशल मीडियाद्वारे लोकांना टार्गेट करतात. पोलिसांनी लोकांना सावध राहण्याचे, फसवणुकीला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.

आधी विवाहित महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट यायची, त्यानंतर जे घडायचं त्याने… तो त्या महिलांनाच का टार्गेट करायचा?
कर्नाटक फ्रॉडImage Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Nov 21, 2025 | 10:37 AM
Share

कर्नाटकच्या चिक्कबल्लापुर मध्ये फसवणुकीची एक मोठी घटना उघडकीस आली आहे. तिथे एका इसमाने विवाहीत महिलांना त्याच्या जाळ्यात अडकवलं आणि त्यानंतर त्यांची फसवणूक केली. सोशल मीडियावरून तो त्या महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचा, त्यांच्याशी ओळख वाढवायचा आणि त्यांना जाळ्यात अडकवायचा, नंतर नको ते करायचा. आरोपी इसमाविरोधात तीन महिलांनी पोलिसांता तक्रार दाखल केली. लग्नाचं वचन देऊन तो आमचं शारीरिक शोषण करायचा, असा आरोप त्या महिलांनी केला आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण ?

सीएम गिरीश उर्फ ​​साईसुदीप असे तरूणाचे नावे असून तो चिंतामणी नगर येथील रहिवासी आहेत. त्याने 1-2 नव्हे तर अनेक महिलांची फसवणूक केल्याचे उघड झाले. फेसबूक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून त्याने पहिले त्या महिलांना फ्रेंड रीक्वेस्ट पाठवली. त्यांनी ती फ्रेंड रीक्वेस्ट स्वीकारल्यानंतर हळूहळू त्याने त्या महिलांशी मैत्री केली. मात्र नंतर तो त्यांना प्रेमात पाडायचा आणि मग त्यांना लग्नाचं आमिष दाखवायचा.

महिलांनी पोलिसांत घेतली धाव

लग्नाचं आमिष दाखवून तो त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवाया, त्याचं शोषण करायचा. एवढंच नव्हे तर त्याने त्या महिलांचे अश्लील व्हिडीओही रेकॉर्ड केले होते, नंतर तेच व्हिडीओ दाखवनून ब्लॅकमेल करून त्याने त्या महिलांकडून लाखो रुपये उकळले. या सर्व प्रकारानमुळे संतापलेल्या महिलांनी न्यायाची मागणी करत पोलिसांत धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते कृष्णमूर्ती यांच्यामार्फत महिलांनी चिंतामणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

अनेकींची केली फसवणूक

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला तेव्हा असे उघड झाले की या आरोपीने नंदागुडी, बेंगळुरू, चिक्कबल्लापूर आणि बांगरपेटसह वेगवेगळ्या ठिकाणांहून 5 पेक्षा अधिक महिलांची फसवणूक केली आणि त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले आहेत. पोलिसांनी आता आरोपीचा शोध सुरू केला आहे आणि प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांनी महिलांना सावध राहण्याचे आवाहनही केले आहे.

दररोज फसवणुकीच्या विविध घटना समोर येत असतात. सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये आजकाल लक्षणीय वाढ झाली आहे. स्कॅमर सोशल मीडियाद्वारे लोकांना लक्ष्य करतात. अशा परिस्थितीत, पोलिसांनी लोकांना सावधगिरी बाळगण्यास आणि कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी त्यांची नीट माहिती जाणून घेण्याचा सल्ला दिला आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.