Latur Accident : उसाच्या ट्रॉलीला डिझेल टँकर धडकून अग्नितांडव! 7 गाड्या जळून खाक

नांदेड महामार्गावर घडला भयानक अपघात! भर रस्त्यात 7 वाहनांमध्ये आगडोंब

Latur Accident : उसाच्या ट्रॉलीला डिझेल टँकर धडकून अग्नितांडव! 7 गाड्या जळून खाक
भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 24, 2022 | 8:15 AM

लातूर : नाशिकमध्ये झालेल्या खासगी बस वाहनाच्या भीषण अपघातासारखाच (Latur Accident) अपघात लातूर येथे घडला. एका डिझेल टँकरने ट्रॅक्टरला धडक दिली. या धडकेनंतर स्फोट होऊन मोठी आग भडकली होती. ही आग रस्त्यावरील इतर वाहनांमध्येही पसरली. जवळपास 7 वाहनं या भीषण अपघातामध्ये (7 Vehicles Burn) जळून खाक झाली. हा अपघात (Nanded Latur Accident) बुधवारी रात्री घडला. या दुर्दैवी घटना एक जण जिवंत होरपळला गेल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. तर 10 ते 12 जण गंभीर जखमी झालेत. दरम्यान, खासगी कार, डिझेल, टँकर याच्यासह एसटी बसच आगीत जळून खाक झाली होती. या अपघातामुळे लातूर नांदेड महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

नांदेड महामार्गावर भातखेडा ते भातांगळी ही दुर्दैवी घटना घडली. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास इंधनाची वाहतूक करणारा ट्रक रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकला. ही धडक इतकी भीषण होती की धडकेनंतर डिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकरने रस्त्यावरच पेट घेतला.

दरम्यान, यानंतर पुढचा तब्बल दीड तास महामार्गावरच अग्नितांडव पाहायला मिळालं. या अपघातात मोठं नुकसान झालं. एकूण सात वाहनं आगीत जळून खाक झालीत. त्यात एक टँकर, दोन ट्रॅक्टर, एक एसटी बस आणि एका ट्रकचा समावेश आहे.

पाहा व्हिडीओ :

नेमकी आग का पसरली?

इंधनाने भरलेला टँकर लातूरहून अहमदपूरकडे जात होता. मात्र वाटेतच या टँकरची आणि उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीची धडक झाली. या धडकेनंतर काही वेळातच टँकर तर पेटलात. शिवाय आजूबाजूने येणाऱ्या दोन कारलाही आगीने आपल्या कवेच घेतलं. त्यानंतर काही कळायच्या आत भातखेड पाटी जवळ आगडोंब उसळला.

एसटी आणि कारमधील प्रवाशांनी कसेबसे आपले प्राण वाचवले. पण काही जण गंभीर जखमी झाले. तर टँकरच्या चालकाच्या पायाला या अपघातात जबर जखम झाली. पण चालकाचा सहकारी मात्र आगीत जळून खाक झाला. या अपघातात जळून खाक झालेली एसटी बस ही नांदेडहून लातूरकडे जात होताी.

रस्त्यावर थरार

या अपघातात सात वाहनं एकाच वेळी पेटल्यानंतर खळबळ उडाली होती. या अपघातामुळे लातूर-नांदेड महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दीड तासांच्या प्रयत्नानंतर अखेर आग आटोक्यात आणण्यात यश आलं. त्यानंतर पुन्हा वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

स्थानिकांच्या मदतीने अग्निशमन दल आणि पोलिसांनी बचावकार्य केलं. जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. या अपघाताची नोंद पोलिसांनी करुन घेतली असून आता पुढील तपास केला जातो आहे.

Non Stop LIVE Update
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.