कृष्णा नदीत ढकलून मुलीला संपवलं, मग स्वतःच पोलिसात तक्रार, वडिलांचा बनाव ‘असा’ झाला उघड

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. बापानेच मुलीला कृष्णा नदीत ढकलून देत जीवे ठार मारलं, मात्र कुरुंदवाड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आधी त्यानेच मुलगी हरवल्याची तक्रार दिली होती.

कृष्णा नदीत ढकलून मुलीला संपवलं, मग स्वतःच पोलिसात तक्रार, वडिलांचा बनाव 'असा' झाला उघड
प्रातिनिधीक फोटो

इचलकरंजी : वडिलांनीच मुलीला नदीत ढकलून जीवे ठार मारल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात उघडकीस आली आहे. वादानंतर बापाने मुलीला पुलावरुन कृष्णा नदीपात्रात ढकलून दिल्याचा आरोप केला जात आहे. मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवणारा बाप पोलिसी खाक्या पाहायला मिळताच ततपप बोलू लागला. आरोपी पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नेमकं काय घडलं?

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. बापानेच मुलीला कृष्णा नदीत ढकलून देत जीवे ठार मारलं, मात्र कुरुंदवाड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आधी त्यानेच मुलगी हरवल्याची तक्रार दिली होती. परंतु पोलिसी खाक्या दाखवताच बापाचा बनाव उघडा पडला आणि त्याने आपल्या कृत्याची कबुली दिली.

दानवाड पुलावरून नदीत ढकलून दिले

मुलगी आणि बापामध्ये काही कारणावरुन मोठा वाद झाला होता. त्या वादातून त्याने स्वतःच्या मुलीला कर्नाटक जुने दानवाड पुलावरून नदीत ढकलून दिले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून कुरुंदवाड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

बहीण-भावाच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या पित्याची हत्या

दरम्यान, पुण्यातील कात्रज-देहू रोड बायपसजवळ एका रहिवासी इमारतीत काम करणाऱ्या वॉचमनची काही महिन्यांपूर्वी मुलाने हत्या केली होती. दोन मुलगे, दोन मुली आणि पत्नीसह इमारतीच्या पार्किंग लॉटमध्येच तो राहत होता. तो घरात कांदा चिरत बसला असताना त्याचा 13 वर्षांचा मुलगा आणि एक मुलगी भांडत असल्याचं त्याला दिसलं. त्याने दोघांचं भांडण सोडवत मध्यस्थी केली. वडील ओरडल्याचा राग मुलाला आला. त्याने वडिलांनी कांदा चिरण्यासाठी घेतलेली सुरी उचलली आणि त्यांच्याच पोटात खुपसली. एकच घाव वर्मी बसला आणि वॉचमन जागच्या जागी कोसळला. रुग्णालयात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

संबंधित बातम्या :

डोक्यात दगड घालून अल्पवयीन मुलीची हत्या , बाथरूम शेजारी मृतदेह आढळल्याने खळबळ

लग्नासाठी नकार दिल्याने बापाकडून मुलीची हत्या, मृतदेह अर्धवट जळल्याने पुन्हा दफन

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI