फरशी कापण्याच्या कटरने गळा कापला, व्यापारी राहत्या घरी मृतावस्थेत सापडल्याने खळबळ

सोलापूरमधील बिजनेसमन श्रीकांत रचा यांचा मृतदेह राहत्या घरी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. फरशी कापण्याच्या कटरने गळा कापलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला.

फरशी कापण्याच्या कटरने गळा कापला, व्यापारी राहत्या घरी मृतावस्थेत सापडल्याने खळबळ
प्रातिनिधीक फोटो

सोलापूर : फरशी कापण्याच्या कटरने गळा कापल्यामुळे व्यापारी मृतावस्थेत आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहरातील बालाजी नगर येथे ही घटना घडली. मात्र ही हत्या आहे की आत्महत्या, याचा तपास पोलीस करत आहेत.

नेमकं काय घडलं?

श्रीकांत रचा यांचा मृतदेह राहत्या घरी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. फरशी कापण्याच्या कटरने गळा कापलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला. श्रीकांत रचा हे करमाळा शहरातील कापड व्यापारी आणि बांधकाम व्यावसायिक आहेत.
त्यांचा खून झाला, की त्यांनी आत्महत्या केली, याचा तपास करमाळा पोलीस करत आहेत.

पुण्यात हिटर छातीला कवटाळून विवाहितेची आत्महत्या

दरम्यान, घरातील विद्युत हिटर आपल्या छातीस कवटाळून विवाहितेने आत्महत्या केली. हिटरचा शॉक लागल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवतमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. धनश्री अजित करडे असे दौंड तालुक्यातील यवतमधील मयत महिलेचे नाव आहे.

सासरी जाच झाल्याचा आरोप

चारचाकी गाडी घेण्यासाठी महिलेला सासरी त्रास दिला जात असल्याचा आरोप केला जात आहे. हुंड्याची मागणी करुन तिला शिवीगाळ, दमदाटी करुन मानसिक आणि शारीरिक छळ देत होते. सासरच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणी यवत पोलीसांनी मयत विवाहित महिलेची सासू, नवरा, दीर आणि नणंद अशा चौघा जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरीतही महिलेचा राहत्या घरी गळफास

दुसरीकडे, पिंपरी-चिंचवड मधील सांगवी भागात महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. त्याच ठिकाणी रक्ताने माखलेली एक डायरीही आढळली होती.

ओढणीने गळफास घेत महिलेची आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवडमधील सांगवी या भागात एका महिले स्वत:च्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यासाठी महिलेने तिच्याच ओढणीचा उपयोग केला. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड या भागात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे महिलेने आत्महत्या नेमकी का केली, हे समजू शकलेले नाही.

संबंधित बातम्या :

ओढणीने गळफास लावून आत्महत्या, महिलेच्या मृतदेहाजवळ आढळली रक्ताने माखलेली डायरी, गूढ वाढलं

कोरोनाने पतीचा मृत्यू, विरहातून पत्नीची 18 महिन्यांच्या मुलीसह आत्महत्या, पुण्याच्या शिक्षक दाम्पत्याचा करुण अंत

पती निधनानंतर 22 वर्षीय पत्नीची आत्महत्या, विरारमध्ये दाम्पत्याचा करुण अंत

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI