मंकावती तीर्थकुंड राज्य सरकारच्या मालकीचे, देवानंद रोचकरींच्या अडचणीत वाढ

संतोष जाधव

| Edited By: |

Updated on: Oct 01, 2021 | 8:04 AM

देवानंद रोचकरी आणि त्यांचे बंधू साहेबराव रोचकरी यांच्या नावे अनधिकृतपणे मिळकत पत्रिका तयार करणारे तत्कालीन कर्मचारी, अनधिकृतपणे अभिलेखाचे नकला तयार करणारे, तपासणी आणि वितरण करणारे कर्मचारी यांच्यावर नियमानुसार तुळजापूर उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी विभागीय चौकशीची कार्यवाही करुन अहवाल सादर करावा, असे आदेश देण्यात आले

मंकावती तीर्थकुंड राज्य सरकारच्या मालकीचे, देवानंद रोचकरींच्या अडचणीत वाढ
Tulja Bhavani

तुळजापूर : तुळजापूर येथील बहुचर्चित तुळजाभवानी देवीचे विष्णूतीर्थ म्हणजेच मंकावती तीर्थकुंड हे राज्य सरकारच्या मालकीचे असून त्याची मिळकत पत्रिका पुनर्गठित करुन तुळजापूर नगर परिषदच्या देखरेखीखाली महाराष्ट्र शासनाची नोंद घ्यावी, असे आदेश जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख स्वाती लोंढे यांनी त्यांच्या कार्यालयात झालेल्या सुनावणी अंती दिले आहेत.

या मंकावती तीर्थकुंडाच्या मालकीची सुनावणी भूमी अभिलेख यांच्या कोर्टात घेण्यात आली, त्यात हा निकाल दिला. तर देवानंद रोचकरी आणि त्यांचे बंधू साहेबराव रोचकरी यांच्या नावे अनधिकृतपणे मिळकत पत्रिका तयार करणारे तत्कालीन कर्मचारी, अनधिकृतपणे अभिलेखाचे नकला तयार करणारे, तपासणी आणि वितरण करणारे कर्मचारी यांच्यावर नियमानुसार तुळजापूर उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी विभागीय चौकशीची कार्यवाही करुन अहवाल सादर करावा, असे आदेश देण्यात आले. यासह रोचकरी यांच्या नावे अनधिकृत करण्यात आलेली मिळकत पत्रिका, नोंदवही उतारा, सनद रद्द केली आहे. त्यामुळे रोचकरी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण?

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारणाऱ्या तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी याला तुळजापूर पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा नोंद झाल्यापासून नाईकवाडी तब्बल 1 वर्ष फरार होता मात्र अखेर त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर कल्याणराव गंगणे यांनी त्याचे वकील शिरीष कुलकर्णी मार्फत तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे 9 मे 2019 रोजी याबाबत लेखी तक्रार केली होती, त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी तात्काळ याचे गांभीर्य ओळखून चौकशी समिती नेमली होती, त्यात अनेक धक्कादायक प्रकार समोर आले.

तुळजाभवानी मंदिर संस्थानचा धार्मिक व्यवस्थापकपदी दिलीप नाईकवाडी कार्यरत असताना 29 नोव्हेंबर 2001 ते 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीत नाईकवाडी यांनी पदाचा दुरुपयोग करत तुळजाभवानी मंदिर संस्थान व भाविकांची फसवणूक केली असून त्याचा ताब्यात असलेल्या श्री तुळजाभवानी देवीचा खजिना व जामदार खान्यातील अतिप्राचिन अलंकार, वस्तू तसेच भाविकांनी अर्पण केलेले सुमारे 348.661 ग्रॅम सोने व सुमारे 71698.274 ग्रॅम चांदीच्या वस्तू तसेच 71 प्राचीन नाणे यांचा वैयक्तिक स्वार्थासाठी अपहार चोरी केली.

या फिर्यादीवरुन पोलिसांनी तात्कालिन धार्मिक व्यवस्थापक दिलीप देविदास नाईकवाडी विरोधात पोलीस ठाण्यात 323 कलम 420, 464, 409, 467, 468, 471, 381 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तत्कालीन जिल्हाधिकारी मुधोळ यांची बदली झाल्यानंतर तुळजाभवानी मंदिर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आदेश दिल्यावर रविवार, 13 सप्टेंबर 2020 रोजी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय अधिकारी तथा तहसीलदार योगिता कोल्हे यांनी फिर्याद दिल्याने तात्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी विरोधात फसवणूक गुन्हा दाखल केला होता.

देवीच्या खजिन्यातील तब्बल 71 प्राचीन नाण्यासह अनेक दागिने गायब 

तुळजाभवानी देवीला अनेक राजे राजवाडे यांनी अर्पण केलेले बहुतांश मौल्यवान व प्राचीन दागिने तिजोरीतून गायब करून गैरव्यवहार केल्याचे अपर जिल्हाधिकारी यांच्या 3 सदस्यीय चौकशीत निष्पन्न झाले होते त्यांत नाईकवाडी यांच्यावर ठपका ठेवत सोने चांदीच्या दागिन्यात काळाबाजार झाल्याचे शिक्का मोर्तब केले होते. तुळजाभवानी मातेला निझाम, औरंगजेब, पोर्तगीज यांच्यासह बिकानेर उदयपूर लखनो बडोदा आणि इंदोर या घराण्यांतील राजे महाराजे यांनी त्यांच्या चलनातील पुरातन नाणी देवी चरणी अर्पण केली होती. या नाण्यांची नोंद तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या रेकॉर्डमध्ये 1980 पर्यंत होती मात्र 2005 व 2018 मध्ये करण्यात आलेल्या पंचनाम्यात या पुरातन 71 नाण्यांसह प्राचीन सोन्या चांदीच्या वस्तू आणि मौल्यवान अलंकार दप्तरी नोंदीत नसल्याचे उघड झाले होते. गंगणे यांनी माहितीच्या अधिकारात तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या साठा नोंद दप्तराची मागणी केली होती त्यात 71 पुरातन नाणी गायब झाल्याचे उघड झाले होते, अखेर या प्रकरणात आरोपी अटक झाल्याने अनेक बाबी उघड होतील.

तुळजाभवानी देवीला अनेक राजे महाराजे यांनी सोने चांदी दागिन्यासह नाणी अर्पण केली होती त्याची नोंद मंदिर संस्थांच्या वहीत होती मात्र पदभार स्वीकारताना व देताना अनेक मौल्यवान वस्तू व दागिने गायब करून त्याचा काळाबाजार करण्यात आल्याचे चौकशी समितीत सिद्ध झाले आहे. देवीच्या खजिन्यातील शिवकालीन नाण्यासह इतर संस्थानची नाणी वस्तूवर डल्ला मारला असून यात मंदिर संस्थांनचे काही अधिकारी घरचे भेदी निघाले आहेत. या घोटाळ्यातील गुन्ह्यात सहभागी अधिकारी यांची व्याप्ती वाढणार असल्याचे दिसते.

नाईकवाडी एकटेच हे करणे शकय नाही , खरा सूत्रधार समोर येणार का ?

तुळजाभवानी देवीचे हे गायब केलेले प्राचीन दागिने व 71 नाणी कोणाला देण्यात आले हे तपासात स्पष्ट होणार आहे, यापूर्वी तुळजाभवानी देवीला अर्पण केलेल्या अनेक महागड्या वस्तू, साड्या, चांदीच्या मूर्ती या तत्कालीन मंत्री, राजकारणी व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना भेट देऊन त्याची मेहेरनजर मिळवण्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे ही नाणी नाईकवाडी यांनी गायब करण्यामागे खरा सूत्रधार समोर येणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या :

तुळजापूरच्या आई भवानीचं प्राचीन मंकावती तिर्थकुंडच हडप केलं, स्थानिक भाजप नेत्याचा प्रताप

मंकावती तीर्थकुंड हडप प्रकरण, फरार आरोपी देवानंद रोचकरी अखेर मंत्रालयाजवळ सापडला

तुळजाभवानीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला, तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक वर्षभराने अटक

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI