AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयआयटी मुंबईमध्ये घुसखोरी करत बनवले व्हिडिओ, आरोपीला अटक, चौकशीतून धक्कादायक खुलासे

आयआयटी मुंबईमध्ये घुसखोरी करत 14 दिवस बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बिलाल अहमद फयाज अहमद तेली याला अटक करण्यात आली आहे.

आयआयटी मुंबईमध्ये घुसखोरी करत बनवले व्हिडिओ, आरोपीला अटक,  चौकशीतून धक्कादायक खुलासे
IIT Bombay
| Edited By: | Updated on: Jul 01, 2025 | 8:53 PM
Share

मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पवईतील आयआयटी मुंबईमध्ये घुसखोरी करत 14 दिवस बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बिलाल अहमद फयाज अहमद तेली याला अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बिलाल अहमद फयाज अहमद तेली याला अटक केल्यानंतर त्याची सखोल चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने सांगितले की, स्वतःला सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणून दाखवण्यासाठी २१ बनावट ईमेल आयडी तयार केले होते. या आयडींचा वापर बेंगळुरू, मंगळुरू आणि हैदराबाद सारख्या वेगवेगळ्या शहरांच्या नावाने व्हिडिओ आणि कंटेंट पोस्ट करण्यासाठी केला होता, जेणेकरून तो सोशल मीडियावर स्वतःची ओळख निर्माण करू शकेल आणि पैसे कमवू शकेल.

गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले की बिलाल डिसेंबर 2024 मध्ये बहरीनला गेला होता आणि त्यापूर्वी दुबईलाही गेला होता. तसेच आयआयटी पवईमध्ये राहत असताना त्याने एका एआय सेमिनारलाही हजेरी लावली होती. विशेष म्हणजे, बिलाल फक्त 10 वी पास आहे आणि त्याने मंगळुरूमधून वेब डिझायनिंगमध्ये एक वर्षाचा डिप्लोमा केला आहे. सध्या तो सुरतमधील एका खाजगी कंपनीत काम करतो आणि त्याचे मासिक उत्पन्न 1.25 लाख रुपये आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिलाल आयआयटी कॅम्पसमध्ये पीएचडी विद्यार्थी असल्याचे भासवून फिरत असे, तो हॉस्टेलच्या कॉमन रूममध्ये झोपत असे. त्याने कॅम्पसमध्ये व्हिडिओ आणि फोटो काढले, परंतु आतापर्यंतच्या तपासात त्याने यातील कोणताही मजकूर कोणालाही पाठवला नाही अशी माहिती समोर आली आहे.

कौटुंबिक पार्श्वभूमी सामान्य

बिलालच्या वडिलांचे कपड्याचे दुकान आहे आणि त्याचे काही नातेवाईक पाकिस्तानमध्ये राहतात. त्याच्या तपासात दहशतवादी किंवा संशयास्पद हालचाली दर्शविणारे अद्याप अद्याप काहीही आढळले नाही. गुप्तचर विभाग आणि दहशतवादविरोधी संस्थांनीही त्याची चौकशी केली आहे. मात्र आतापर्यंत कोणतेही गुन्हेगारी पुरावे सापडलेले नाहीत. बिलाल तेली 7 जुलैपर्यंत गुन्हे शाखेच्या ताब्यात असणार आहे.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.