Mumbai Crime : स्वत: दुसरं लग्न केलं, पण पहिल्या पत्नीने प्रेमविवाह करताच भडकला, रागाच्या भरात थेट…
मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विभक्त झालेल्या पहिल्या पत्नीने प्रेमविवाह केला म्हणून एक इसम एवढा संतापला की त्याने थेट त्या तरूणावर प्राणघातक हल्लाच केला. गोवंडीच्या शिवाजीनगरमध्ये हा प्रकार घडला.

मुंबई | 1 फेब्रुवारी 2024 : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विभक्त झालेल्या पहिल्या पत्नीने प्रेमविवाह केला म्हणून एक इसम एवढा संतापला की त्याने थेट त्या तरूणावर प्राणघातक हल्लाच केला. गोवंडीच्या शिवाजीनगरमध्ये हा प्रकार घडला. या हल्लामध्ये आरोपीच्या पहिल्या पत्नीशी लग्न करणार तरूण गंभीर जखमी झाला आहे. अतिशय बेदरकारपणे केलेल्या हल्ल्यामुळे आसपासच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे.
स्वत: दुसरं लग्न केलं पण
मिळालेल्या माहितीनुसार, हुसेन शेख असे आरोपीचे नाव असून तो 38 वर्षांचा आहे. तो गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात राहतो. वर्षभरापूर्वी हसेनने त्याच्या पहिल्या पत्नीला सोडलं आणि स्वत: दुसरं लग्न केलं. त्यामुळे त्याची विभक्त पत्नी एकटीच रहात होती. याच दरम्यान तिची युनूस शेख (वय 38) यांच्यासोबत ओळख झाली. त्यांच्या ओळखीचे हळूहळू प्रेमात रुपांतर झाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कागही दिवसांपू्र्वीच ते विवाहबद्ध झाले.
मात्र ही बाब हुसेनला समजताच तो प्रचंड संतापला. सोमवारी रात्री युनूस हा गोवंडीच्या रफिक नगर भागातून जात असतानाच हुसनने त्याला रस्त्यात गाठले. त्यांच्यात बराच वाद झाला. संतापाच्या भरात हुसनने चाकू काढला आणि युनूसवर अनेक वार केले. रक्तबंबळा झालेला युनूस खआली कोसळला. आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तेथील अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी हुसेनला अटक केली आहे. यासंदर्भात अधिक तपास सुरू आहे.
