AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॉटेलच्या खोलीत मार्केटिंग एक्झिक्युटिव्हची डेडबॉडी, मृत्यूपूर्वी शेवटचा Video कॉल कोणाला ?

शुक्रवारी रात्री इटावा शहरातील बजरिया येथील जॉली हॉटेलमध्ये गोंधळ उडाला. हॉटेलच्या 101 क्रमांकाच्या खोलीत राहणाख्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच गदारोळ सुरू झाला. त्याने असं का केलं ?

हॉटेलच्या खोलीत मार्केटिंग एक्झिक्युटिव्हची डेडबॉडी, मृत्यूपूर्वी शेवटचा Video कॉल कोणाला ?
हॉटेलच्या खोलीत सापडली मार्केटिंग एक्झिक्युटिव्हची डेडबॉडीImage Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Apr 19, 2025 | 12:13 PM
Share

इटावा येथील जॉली हॉटेलमध्ये एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृताचे नाव मोहित कुमार (33) असे आहे, तो औरैया येथील रहिवासी होता. गुरुवारी रात्री तो हॉटेलमध्ये राहिला आणि शुक्रवारी रात्री त्याचा मृतदेह खोली क्रमांक 101 मध्ये आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून त्याचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करून तपास सुरू केला आहे. मोहितच्या आत्महत्येमागे नेमकं काय कारण होतं याचा पोलीस तपास करत आहेत. जीव देण्यापूर्वी मोहितने व्हिडिओ कॉल केला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या घटनेची माहिती मिळताच हॉटेलमध्ये गोंधळ उडाला. तरूणाच्या मृत्यूची बातमी समजताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्या पथकात एसपी सिटी अभयनाथ त्रिपाठी, सीओ सिटी रामगोपाल शर्मा, प्रभारी निरीक्षक विक्रम सिंह आणि फॉरेन्सिक टीमचा समावेश होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेततो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर हॉटेलमच्या खोलीतून मोहितचा मोबाईल , लॅपटॉपही हस्तगत करून त्यांचीही तपासणी करण्यात येत आहे. त्याने नेमकं हे टोकाचं पाऊल का उचललं, काही त्रास होता का याचा तपास सुरू असल्याचं एसपी सिटी अभयनाथ त्रिपाठी यांना सांगितलं. मोहितच्या कुटुंबियांना त्याच्या मृत्यूची माहिती देण्यात आली आहे.

दोन दिवसांसाठी बूक केली 101 नंबरची खोली

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहित कुमार गुरुवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास हॉटेलमध्ये थांबला होता. तो मार्केटिंगमध्ये काम करतो आणि दोन दिवस हॉटेलमध्ये राहण्याची इच्छा असल्याचे त्याने हॉटेल कर्मचाऱ्यांना सांगितले होतं. मात्र शुक्रवारी दिवसभर त्याच्या खोलीत कोणतीही हालचाल दिसून आली नाही. रात्री 9 वाजता हॉटेल कर्मचारी आशिष यादव यांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा फोन बंद आढळला. अखेर हॉटेलच्या लोकांना संशय आल्यावर त्यांनी मोहितच्या खोलीचा दरवाजा ठोठावला, पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर कर्मचाख्यांनी दरवाजा जबरदस्तीने तोडला, तेव्हा त्यांना समोरचं दृश्य पाहून मोठा धक्का बसला. समोर मोहित बेडशीटच्या साहाय्याने पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला.

आत्महत्येपूर्वी कोणाला केला व्हिडीओ कॉल ?

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मोहितने आत्महत्येपूर्वी व्हिडिओ कॉल केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. तांत्रिक तपासणीनंतरच याची पुष्टी करता येईल. मोहित हा मानसिक तणावाखाली होता का किंवा तो कोणत्याही प्रकारच्या फसवणूक, धमकी किंवा इतर कोणत्याही समस्येत सामील होता का, त्याने कोणाला व्हिडीओ कॉल केला होता, हे आता पोलीस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.