अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नवजात बाळाला जन्म दिल्याने धक्कादायक घटना समोर, संशयित आरोपीही अल्पवयीन

नाशिकच्या म्हसरूळ शिवारात सहा अल्पवयीन मुलींवर आधार आश्रमात बलात्कार केल्याच्या घटना समोर आल्याने शहरात खळबळ उडालेली असतांना दुसरी धक्कादायक घटना समोर आली आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नवजात बाळाला जन्म दिल्याने धक्कादायक घटना समोर, संशयित आरोपीही अल्पवयीन
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Nov 28, 2022 | 4:44 PM

नाशिक : नाशिकच्या आधार आश्रमातील अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असतांनाच आता नाशिकच्या देवळाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलीने नवजात बाळाला जन्म दिल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यामध्ये गंभीर बाब म्हणजे अल्पवयीनच आरोपी असल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकच्या देवळाली पोलीसांनी पोक्सो कायद्या अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीने नुकताच नवजात बाळाला जन्म दिला आहे. रुग्णालयात पीडित मुलगी असून तिच्यावर उपचार केले जात आहे. पीडित मुलीच्या आईने याबाबत देवळाली पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिल्यानंतर पोलीसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास केला जात आहे.

अल्पवयीन मुलाचा शोध देवळाली पोलीस ठाण्याचे पोलीस घेत असून वर्षभरापूर्वी घडलेला बलात्काराचा गुन्हा इतक्या दिवस का समोर आला नाही ? याबाबत देखील पोलिस तपास करीत आहे.

नाशिकच्या म्हसरूळ शिवारात सहा अल्पवयीन मुलींवर आधार आश्रमात बलात्कार केल्याच्या घटना समोर आल्याने शहरात खळबळ उडालेली असतांना दुसरी धक्कादायक घटना समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा

नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलींवर अल्पवयीन मुलानेच लैंगिग अत्याचार केल्याने ती गरोदर राहिली होती, नवजात बाळाला पीडित मुलीने जन्म दिल्याने ही घटना उघडकीस आली आहे.

अल्पवयीन मुलगा हा पीडित मुलीच्या ओळखीतील असल्याची प्रथम दर्शनी माहिती समोर आली असून दोघेही अल्पवयीन असल्याने महिला बाल कल्याण विभागाच्या मार्गदर्शनाखाली हे प्रकरण पोलिसांना हातळावे लागणार आहे.

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.