AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परदेशातून आणलेलं 60 तोळे सोनं घेऊन विमानतळावरुन निसटला, मात्र वाटेत रिक्षावाल्याने लुटला !

घाटकोपर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे आणि गुन्हे प्रकटीकरणं पथक या गुन्ह्याचा तपास सुरु केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली.

परदेशातून आणलेलं 60 तोळे सोनं घेऊन विमानतळावरुन निसटला, मात्र वाटेत रिक्षावाल्याने लुटला !
प्रवाशाचे 60 तोळे सोने चोरणाऱ्या आरोपींना अटकImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jan 24, 2023 | 8:08 PM
Share

मुंबई : परदेशातून तस्करी करुन आणलेले प्रवाशाचे सोने घेऊन पसार झालेल्या रिक्षाचालकासह त्याच्या साथीदाराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. चार महिने कसून शोध घेत पोलिसांनी चोरट्यांना बिहारमधून अटक केली आहे. नंदकिशोर यादव आणि श्रवणकुमार नकुल शाह अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपीला अटक केल्यानंतर या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. हे सोने तक्रारदाराने बँकॉकमधून तस्करी करुन आणले होते. यामुळे बँकॉकमधून भारतात तस्करी करून हे सोने आणणारे फिर्यादी राजेश वरीया हे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

सप्टेंबर 2022 मध्ये राजेश प्रेमजी वरीया हे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून घाटकोपरला जाण्यासाठी निघाले होते. त्यासाठी त्यांनी एक रिक्षा घेतली होती. प्रवासादरम्यान त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सोने असल्याचं रिक्षावाल्याच्या लक्षात आलं.

प्रवाशाला काही कळायच्या आत रिक्षावाला सोन्याची बँग घेऊन पसार

रिक्षा घाटकोपरजवळ पोहोचताच रिक्षावाल्याने फिर्यादी राजेश वरीया यांना काही कळायच्या आत सोन्याने भरलेली बॅग घेऊन तिथून रिक्षासहित पळ काढला. रिक्षावाला सोने घेऊन पसार झाल्याचं लक्षात येताच राजेश वरीया यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती.

घाटकोपर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे आणि गुन्हे प्रकटीकरणं पथक या गुन्ह्याचा तपास सुरु केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली.

यानंतर अधिक तपास केला असता आरोपी नंदकिशोर यादव आणि त्याचा साथीदार श्रणकुमार नकुल साह हे बिहार राज्यातल्या जमुई जिल्ह्यातले असल्याचं तपासात समोर आलं. दोघेही बिहारमधील नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनो इथे लपल्याची माहिती मिळाली.

घाटकोपर पोलीस ठाण्याचे पथक आरोपीच्या शोधासाठी तात्काळ बिहार राज्यात पोहोचले. सोनोमधल्या स्थानिक पोलीस ठाण्याच्या मदतीने दोन्ही आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या.

आरोपींना अटक केल्यानंतर तस्करीचे सोने असल्याचे उघड

आरोपींनी चोरी केलेल्या 30 लाख रुपये किमतीच्या सोन्यापैकी 24 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 9 लाख रोख रक्कम आहे. आरोपीना अटक करत त्यांची चौकशी केली असता हे सोने फिर्यादीने बँकॉक येथून तस्करी करुन आणल्याचे उघड झाले.

या गुन्ह्यात फिर्यादी असणारे राजेश वरीया यांनी कस्टम आणि डीआरआयच्या डोळ्यात धूळफेक करून हे सोनं लपवून भारतात आणलं होतं. हे सोनं घेऊन ते घाटकोपर रेल्वे स्टेशनकडे जात होते. त्यादरम्यान आरोपींनी त्यावर डल्ला मारला होता.

घाटकोपर पोलिसांनी आता या आरोपींना अटक करून मुद्देमाल हस्तगत केला. मात्र बँकॉकमधून भारतात तस्करी करून हे सोने आणणारे फिर्यादी राजेश वरीया हे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.