AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Sadan Scam : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्र सदन घोटाळा पुन्हा तापण्याची शक्यता, उच्च न्यायालयात अपील करण्याची मागणी

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात सप्टेंबर 2021 मध्ये मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सहा आरोपींना दोष मुक्त केले होते.

Maharashtra Sadan Scam : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्र सदन घोटाळा पुन्हा तापण्याची शक्यता, उच्च न्यायालयात अपील करण्याची मागणी
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्र सदन घोटाळा पुन्हा तापण्याची शक्यताImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Aug 24, 2022 | 8:49 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळा (Maharashtra Sadan Scam) प्रकरणात माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना दोन वर्षापेक्षा अधिक काळ तुरुंगवासामध्ये राहावं लागलं होतं. मात्र आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर महाराष्ट्र सदन घोटाळ्याची पुन्हा चौकशी (Inquiry) करण्यात यावी अशी मागणी आज विधान मंडळ सभागृहामध्ये करण्यात आली. मुंबई सत्र न्यायालयाने छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्यात दिलेल्या क्लीनचिटच्या निर्णयाला उच्च न्यायालयात दाद मागण्याची मागणी देखील करण्यात आल्याने पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्र सदन घोटाळा तापण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात सप्टेंबर 2021 मध्ये मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सहा आरोपींना दोष मुक्त केले होते.

महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया आणि भाजप नेते किरीट सौमया यांनी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे केला होता. त्यानंतर या प्रकरणात या तक्रारीच्या आधारावर ईडीने देखील गुन्हा दाखल करत छगन भुजबळ यांना अटक केली होती.

भुजबळांना दोषमुक्त केल्यानंतर कुठलीही अपील करण्यात आली नव्हती

छगन भुजबळ यांना सत्र न्यायालयाने दोष मुक्त केल्यानंतर या विरोधात कुठलीही अपील उच्च न्यायालयात करण्यात आली नव्हती. तत्कालीन ठाकरे सरकारच्या कार्यकाळामध्ये राज्याच्या न्याय आणि विधी विभागाकडून यासंदर्भात मत विचारण्यात आले होते. त्यावेळी अपील न करण्याचा निर्णय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता, असे आज उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदनात आमदार सुहास कांदे यांनी केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाराष्ट्र सदन घोटाळा संदर्भात उच्च न्यायालयात अपील करण्यात यावी याकरीता मागणी करण्यात आली. यामुळे पुन्हा राज्यात विरोधक आणि राज्य सरकारमध्ये येत्या काळामध्ये संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

काय आहे महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण ?

साल 2005 मध्ये कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता याप्रकरणी विकासकाची नेमणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर पीएमएलए अंतर्गत याप्रकरणी ईडीनंही कारवाई केली होती. एसीबीच्या वतीनं मुंबई सत्र न्यायालयात आयपीसी कलम 409 (लोकसेवक असूनही सरकारी मालमत्तेचे नुकसान) आणि कलम 471 (अ) (बोगस कागदपत्रे तयार करणे) यानुसार आरोप ठेवले आहेत. या व्यवहाराच्या वेळेस भुजबळ राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री होते. याप्रकरणातील अन्य संबंधितांवरही हा आरोप ठेवण्यात आलेला आहे. संबंधित बांधकामाच्या वेळेस तयार केलेला सुस्थापन अहवाल म्हणजेच (फिजिबिलिटी रिपोर्ट) हा दिशाभूल करणारा होता, असा आरोप करण्यात आला होता. भुजबळ व अन्य आरोपींनी संगनमताने हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार करुन खासगी कंपनीला जमीन विकासाचे काम दिले आणि आर्थिक स्थितीबाबत बोगस कादगपत्रे तयार केली, ज्यामुळे सरकारी मालमत्तेचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले. एक लोकसेवक या नात्याने आरोपींनी या सरकारी मालमत्तेच्या हितासाठी एक विश्‍वस्त म्हणून काम करायला हवे होते. मात्र तसे झाले नाही, असा आरोप करण्यात आला होता. (Demand for appeal in Maharashtra Sadan scam case in High Court)

Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग