पतपेढीत दागिने ठेवताय? सावधान! पतपेढीतील दागिन्यांची चोरी झाल्यानं खळबळ, कोण आहेत चोर?

Dombivli Crime News :13 लाख रुपयांपेक्षाही जास्त किंमतीचे दागिने चोरीला गेल्यानं खळबळ उडाली, पोलिसांत तक्रार केली गेली. पोलिसांच्या तपासातून जी माहिती समोर आली, त्याने पतपेढीतील सगळे कर्मचारी हादरुन गेले.

पतपेढीत दागिने ठेवताय? सावधान! पतपेढीतील दागिन्यांची चोरी झाल्यानं खळबळ, कोण आहेत चोर?
पतपेढीच्या लॉकरमधून सोन्याची चोरीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 19, 2022 | 7:57 AM

ठाणे : बँकेमध्ये पैसे ठेवण्यासोबत अनेकजण सोनंदेखील (Gold in Bank Locker) बँकेत ठेवतात. गेल्या काही दिवसांत ऑनलाईन फसवणूक, डेबिट कार्डचा गैरवापर, या प्रकारांमुळे बँकेत पैसे ठेवणं लोकांना असुरक्षित (Insecurity) वाटू लागलं होतं. त्यानंतर आता सोनं ठेवण्याबाबतही असुरक्षितता निर्माण होऊ लागलीय. आता तर चक्क पतपेढीमध्ये ठेवण्यात आलेले दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

डोंबिवली (Dombivli Crime News) पूर्वेच्या गोपाळ नगर परिसरात असलेल्या पतपेढीतून दागिन्यांची चोरी झाली. लॉकरमध्ये ठेवण्यात आलेले तब्बल 13 लाख 65 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. अखेर याप्रकरणी पोलिसांनी तपास केल्यानंतर पतपेढीतील कर्मचारी महिलेनेच चोरी केल्याचं उघड झालंय.

डोंबिवलीच्या आनंद प्रेम नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेतून दागिन्यांची चोरी झाली होती. या चोरीने एकच खळबळ उडाली होती. दागिन्यांच्या चोरी प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, या पतपेढीत काम करणाऱ्या कर्मचारी महिलेनंच ही चोरी केली असल्याचं समोर आलंय. या महिलेला अटकही करण्यात आलीय. सुरुवातीला पोलिसांनी संशय आल्यानं या महिलेला ताब्यात घेत तिची चौकशी केली.

पाहा लाईव्ह घडामोडी : Video

पोलिसांच्या चौकशीला घाबरुन अखेर महिलेनं चोरी केल्याची कबुली दिली. अखेर या महिलेवर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेत तिला बेड्या ठोकल्यात. तसंच तिच्याकडून मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला आहे. पुढील कारवाई आणि तपास टिळकनगर पोलिसांकडून केला जातोय.

शाखेत कुणीही नाही, हे पाहून पतपेढीत क्लार्क असणाऱ्या महिलेनं डाव साधला होता. तिने आधी लॉकरची चावी चोरली. त्यानंतर तिने या चावीच्या आधारे लॉकर उघडलं आणि दागिने चोरले. चोरी केलेले दागिने या महिलेने एका सोनाराला विकले होते, अशी माहिती तपास अधिकारी पांढरी पीठे यांनी दिली. तब्बल 13 लाख 65 रुपयांचे चोरी केलेले दागिने पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. चोरीच्या या घटनेमुळे आता पतपेढीत दागिने ठेवणंही कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.