AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Smuggling : डीआरआयची मुंबई विमानतळावर मोठी कारवाई, ‘एवढ्या’ किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

परदेशी नागरिकांसह विविध व्यक्तींकडून कॅप्सूलच्या स्वरूपात शरीरात लपवून, ट्रॅव्हल बॅग, कपड्यांमधून तसेच विविध प्रकारच्या मशिनमधून आणले जात असल्याचे उघडकीस आले आहे. आरोपीकडे 20 लाखांहून अधिक रकमेची बेहिशेबी रोकडही सापडली आहे.

Gold Smuggling : डीआरआयची मुंबई विमानतळावर मोठी कारवाई, 'एवढ्या' किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
मुंबई विमानतळावर सोने तस्करीचा पर्दाफाशImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jan 24, 2023 | 9:46 PM
Share

मुंबई : मुंबई डीआरआयतर्फे एक मोठी कारवाई करत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत 38 किलो सोने जप्त करण्यात आले असून, जप्त सोन्याची किंमत जवळपास 21 कोटी रुपये आहे. तसेच 20 लाखांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. तस्करीचे हे सोने कोडवर्डच्या माध्यमातून स्थानिक ऑपरेटर्सना दिले जात होते. परदेशातून आणण्यात आलेला सोना लपविण्यासाठी ट्रॅव्हल बॅग, कापड किंवा इतर माध्यमांतून लपवून आणले जात होते.

मुंबई विमानतळ आणि एअर कार्गो कॉम्प्लेक्स मुंबईमधून सोन्याच्या तस्करीच्या विविध प्रकरणांच्या तपासादरम्यान, डीआरआय मुंबईच्या अधिकाऱ्यांनी एक विशिष्ट गुप्तचर यंत्रणा विकसित केली होती.

या यंत्रणेने सापळा लावून परदेशातून तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. परदेशी नागरिकांचा समावेश असलेले एक सिंडिकेट तस्करी केलेल्या सोन्याच्या प्रक्रियेत आणि वितरणात गुंतले आहे. या सोन्याच्या तस्करीचे पैसे हवाला चॅनलद्वारे वितरित केले जात असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीप्रमाणे सोमवारी डीआरआय मुंबईच्या अधिकार्‍यांनी गुप्तचर माहितीच्या आधारे काम करत सुनियोजित आणि समन्वित ऑपरेशनची योजना आखली आणि अंमलात आणली.

डीआरआय अधिकार्‍यांच्या पथकाने सीमा शुल्क कायदा, 1962 अंतर्गत संशयित परिसराची झडती घेतली जेथे तस्करीचे प्रकरण समोर आले. सदर परिसराची कसून झडती घेतल्याने प्रक्रियेच्या विविध टप्प्यांत 36 किलोपेक्षा जास्त बेहिशेबी सोने जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या सोन्याची किंमत 21 कोटी रुपये आढळून आली.

परदेशी नागरिकांसह विविध व्यक्तींकडून कॅप्सूलच्या स्वरूपात शरीरात लपवून, ट्रॅव्हल बॅग, कपड्यांमधून तसेच विविध प्रकारच्या मशिनमधून आणले जात असल्याचे उघडकीस आले आहे. आरोपीकडे 20 लाखांहून अधिक रकमेची बेहिशेबी रोकडही सापडली आहे.

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.