मुंबईत 11 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ, 29 वर्षीय वॉचमनला अटक

कांजूरमार्ग येथील हनुमान गल्ली येथे राहणारा 29 वर्षीय आरोपी 15 ऑगस्टपासून मुलीचा छळ करत होता, असे पोलिसांनी सांगितले. पीडितेने शुक्रवारी आई-वडिलांकडे आपल्यावरील अत्याचाराचा पाढा वाचला. त्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली

मुंबईत 11 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ, 29 वर्षीय वॉचमनला अटक
प्रातिनिधिक फोटो


मुंबई : गृहनिर्माण सोसायटीतील एका 11 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका सुरक्षा रक्षकाला मुंबईत अटक करण्यात आली आहे. कांजूरमार्ग येथील संबंधित सोसायटीत आरोपी वॉचमन गेल्या महिनाभरापासून काम करत होता.

काय आहे प्रकरण?

पीडितेने शुक्रवारी आई-वडिलांकडे आपल्यावरील अत्याचाराचा पाढा वाचला. त्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. कांजूरमार्ग येथील हनुमान गल्ली येथे राहणारा 29 वर्षीय आरोपी 15 ऑगस्टपासून मुलीचा छळ करत होता, असे पोलिसांनी सांगितले.

22 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

कलम 354 (A) आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 22 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

साकीनाका बलात्कार प्रकरण

मुंबईच्या साकीनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना 10 सप्टेंबरला समोर आली. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात 9 सप्टेंबरच्या रात्री ही धक्कादायक घटना घडली होती. मोहन चौहान या नराधमाने महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचं संतापजनक आणि अमानुष कृत्य केलं होतं. मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

साकीनाका खैरानी रोड येथे मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार कंट्रोल रुमला प्राप्त झाली होती. त्यानुसार साकीनाका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या घटनेमुळे स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.

तीन दिवस मृत्यूशी झुंज

या घटनेनंतर तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, तीन दिवस सुरू असलेली तिची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली. बलात्कारानंतर प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर डीसीपी आणि एसपींनी तात्काळ राजावाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

हेही वाचा :

हातोड्याच्या धाकाने स्कायवॉकवरुन मित्रांना पळवलं, शिर्डीहून आलेल्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार

वर्षभर सामूहिक बलात्कार, पीडितेच्या घरात शिरुन कुटुंबियांनाही मारहाण, पुण्यातल्या नण्या वाघमारे गँगचं भयानक कृत्य

तरुणीसोबत आधी दोस्ती केली, नंतर नोकरीचं आमिष, कारमध्येच सामूहिक बलात्कार, पीडितेला हायवेवर फेकून दिलं

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI