AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जमावाची युवकाला बेदम मारहाण, मुलाला वाचवण्यासाठी आई पडली अंगावर पण…

Mumbai motorist Crime: व्हिडिओमध्ये आकाश जमिनीवर पडलेला दिसत आहे. तसेच जमाव त्याला बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे. फुटेजमध्ये आकाशची आई दीपाली त्याच्यावर झोपून आणि त्याला संरक्षण देण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहे.

जमावाची युवकाला बेदम मारहाण, मुलाला वाचवण्यासाठी आई पडली अंगावर पण...
जमावाची युवकास बेदम मारहाण
| Edited By: | Updated on: Oct 15, 2024 | 10:59 AM
Share

Mumbai Crime  News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे मुंबई हादरली आहे. मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तसेच इतर आरोपींना पकडण्यासाठी १५ पथके तयार ठिकठिकाणी पाठवली आहे. मुंबईतील या गुन्हेगारी घटनेनंतर आता  भयानक प्रकार समोर आला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. किरकोळ कारणावरुन जमावाने युवकाची हत्या केली आहे. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली आहे.

काय घडला प्रकार

मुंबईत ही धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून जमावाने एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. गाडी ओव्हरटेक करण्यावरून त्याचा वाद झाला होता. त्यामुळे त्याला जमावाने बेदम मारहाण केली. आकाश माइन (वय २८) असे त्या मृत युवकाचे नाव आहे. मालाडच्या दिंडोशी भागात ही घटना घडली. आकाश माइन हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता आहे.

रिक्षाचालकांकडून मारहाण

दिंडोशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश कदम या ऑटोचालक आणि आकाश माईन यांच्यात वाद झाला. आकाश हा दुचाकीवर होता. तर अविनाश कदम हा रिक्षाचालक आहे. ओव्हरटेकवरुन त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी इतर रिक्षाचालकही आकाशला मारहाण करण्यासाठी पोहचले. त्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

व्हिडिओमध्ये आकाश जमिनीवर पडलेला दिसत आहे. तसेच जमाव त्याला बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे. फुटेजमध्ये आकाशची आई दीपाली त्याच्यावर झोपून आणि त्याला संरक्षण देण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहे. तसेच आकाशचे वडील हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु त्यांच्यावरही आरोपींनी हल्ला केला आहे. आकाश हा मालाड पूर्व येथे राहणाऱ्या त्याच्या आई-वडिलांना दसऱ्याच्या निमित्ताने भेटण्यासाठी गेला होता. टनेच्या वेळी आकाश पत्नीसोबत दुचाकीवर होता, तर त्याचे आई-वडील दुसऱ्या ऑटो रिक्षात होते. पोलिसांनी या प्रकरणी 9 आरोपींना अटक केली आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.