AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांचे वेशांतर, अखेर सोनसाखळी चोराच्या मुसक्या आवळल्या

मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी हे सर्व आरोपीला पकडण्यासाठी केले आहे. 20 डिसेंबर रोजी सुनंदा गुटेकर या महिलेची सोनसाखळी दोन चोरट्यांनी दुचाकीवर येऊन खेचून पळून गेले. घटनेनंतर कुर्ला येथील विनोबा भावे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत तपास सुरू केला असता अशाच प्रकारच्या घटना मुंबईच्या तीन भागात काही तासांत घडल्या होत्या.

Mumbai Crime : गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांचे वेशांतर, अखेर सोनसाखळी चोराच्या मुसक्या आवळल्या
गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांचे वेशांतर
| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 3:14 PM
Share

मुंबई : पोलीस तर्फे गुन्हेगारांना पकडण्यासाठी अनेक उपाय करत असतात. असाच एका प्रकरणात एका सोनसाखळी चोराला पकडण्यासाठी पोलिसांनी वेशांतर केले. वेशांतर करून आरोपीवर पाळत ठेवून त्याला जेरबंद केले आणि त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीला पकडण्यासाठी मुंबई पोलीस अधिकारी हे एटीएमच्या बाहेर सुरक्षा रक्षक बनले. एवढंच नव्हे तर मुंबई पोलीस अधिकारी जेवण पोहचवणारे डिलिव्हरी बॉय सुद्धा बनले. डिलिव्हरी बॉय आणि सुरक्षा रक्षक बनलेल्या पोलिसांना आरोपीला पकडण्यासाठी थंडीत रात्र काढावी लागली.

20 डिसेंबर रोजी चोरट्यांनी सोनसाखळी चोरली होती

मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी हे सर्व आरोपीला पकडण्यासाठी केले आहे. 20 डिसेंबर रोजी सुनंदा गुटेकर या महिलेची सोनसाखळी दोन चोरट्यांनी दुचाकीवर येऊन खेचून पळून गेले. घटनेनंतर कुर्ला येथील विनोबा भावे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत तपास सुरू केला असता अशाच प्रकारच्या घटना मुंबईच्या तीन भागात काही तासांत घडल्या होत्या. यावर विनोबा भावे पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही व इतर माध्यमातून तपास सुरू केला. त्यात गुन्ह्यात वापरलेली दुचाकी मिळाली. मात्र ती तेथेच टाकून आरोपी पुढे रिक्षाने निघून गेला होता.

चोराला पकडण्यासाठी पोलीस सुरक्षारक्षक, झोमॅटो बॉय बनले

पोलिसांनी यावर अधिक तपास केला असता तो आपली दुसरी दुचाकी वापरत असल्याचे निष्पन्न झाले. यावर मुंबई पोलिसांच्या टीमने त्यावर पाळत ठेवण्यासाठी आणि शोध घेण्यासाठी एटीएमच्या बाहेर सुरक्षा रक्षक आणि झोमेटोचे डिलिव्हरी बॉय बनले. रात्री थंडीतही आरोपीचा शोध घेत त्या चोराची माहिती पोलिसांनी काढली. सदर चोर एका वस्तीत असल्याचे पोलिसांना कळले. मात्र जेव्हा पोलीस त्याला अटक करण्यास गेले असता त्या वस्तीतील महिलांनी त्या चोराला लपवत पोलिसांशी हुज्जत घातली. मात्र तरीही पोलिसांनी फैजल अली युसुफ अली शेख ईराणी याला अटक केली.

अटक आरोपी अट्टल सोनसाखळी चोर

अटक आरोपी फैजल अली युसुफ अली शेख ईराणी हा अट्टल सोनसाखळी चोर असून 9 पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात अनेक गुन्हे नोंद आहेत. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्याच्या टोळीतील इतरांचा तपास सध्या पोलीस करत आहेत. मंगळसूत्र चोरीच्या घटना वाढल्या असून काही अट्टल गुन्हेगार हे कृत्य करत आहेत तर पोलीसही ऊन पाऊस थंडी ना पाहता वेळेस वेशांतर करून देखील आपले कर्तव्य निभावत आहे. मात्र आपणही आपल्या किंमती वस्तूची जपणूक स्वतः करणे अत्यंत गरजेचे आहे. (Mumbai police caught the gold chain thief disguised)

 इतर बातम्या

रस्त्यात गाडी बंद पडल्याचे निमित्त, मदत करणाऱ्यानं जाळ्यातच ओढलं, सुरू झाला अत्याचाराचा सिलसिला!

Malegaon riots| 30 तलवारींचे मालेगाव दंगल कनेक्शन; घटनेआधी एकदिवस आरोपींनी मागवल्या, पोलिसही चक्रावले

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.